धर्म आणि जात परिवर्तन करणाऱ्यांना आरक्षण देऊ नये, भाजपा खासदाराचे वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 08:48 IST2018-07-16T08:47:25+5:302018-07-16T08:48:16+5:30

धर्म आणि जात परिवर्तन करणाऱ्यांना आरक्षण आणि सरकारच्या अन्य सुविधांचा लाभ देण्यात येऊ नये, असे वक्तव्य करून छत्तीसगडमधील भाजपा खासदाराने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Should not give reservation to who change religion and caste, BJP MP statement | धर्म आणि जात परिवर्तन करणाऱ्यांना आरक्षण देऊ नये, भाजपा खासदाराचे वक्तव्य 

धर्म आणि जात परिवर्तन करणाऱ्यांना आरक्षण देऊ नये, भाजपा खासदाराचे वक्तव्य 

रायपूर - धर्म आणि जात परिवर्तन करणाऱ्यांना आरक्षण आणि सरकारच्या अन्य सुविधांचा लाभ देण्यात येऊ नये, असे वक्तव्य करून छत्तीसगडमधील भाजपा खासदाराने नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आरक्षणावरून  पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

भाजपाचे बस्तर येथील खासदार दिनेश कश्यप आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हणाले की, जे लोक धर्मपरिवर्तन, जात परिवर्तन करतात, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये. तसेच या लोकांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या अन्य सोईसुविधांचाही लाभ मिळता कामा नये, असे माझे वैयक्तिक मत आहे."  याआधीही भाजपाच्या अनेक नेत्यांनी आरक्षणावरून उलटसुलट वक्तव्ये करून वादाला निमंत्रण दिले होते. 



 

Web Title: Should not give reservation to who change religion and caste, BJP MP statement