Seema Haider : पैशांची कमतरता, रेशनही नाही… स्वत:चं घर सोडून दुसरीकडे राहण्याची सीमा-सचिनवर आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 11:21 IST2023-07-30T10:49:17+5:302023-07-30T11:21:59+5:30
Seema Haider : सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीणा सध्या रबुपुरा येथील दुसऱ्या घरात राहत आहेत. याच दरम्यान सीमा-सचिन आणि सचिनच्या वडिलांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Seema Haider : पैशांची कमतरता, रेशनही नाही… स्वत:चं घर सोडून दुसरीकडे राहण्याची सीमा-सचिनवर आली वेळ
पाकिस्तानातूनभारतात पळून आलेला सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीणा सध्या रबुपुरा येथील दुसऱ्या घरात राहत आहेत. याच दरम्यान सीमा-सचिन आणि सचिनच्या वडिलांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सचिनच्या वडिलांनी सांगितले की, पोलिस केसमुळे संपूर्ण कुटुंब घरीच आहे. त्यांना बाहेर पडताही येत नाही. घरची परिस्थिती ठीक नाही. खाण्यापिण्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे.
सचिनचे वडील नेत्रपाल म्हणाले, "आम्ही रोज कमावून खाणारी लोकं आहोत. मात्र जेव्हापासून पोलिसांनी त्यांना घराबाहेर न पडण्यास सांगितले, तेव्हापासून ते काहीच कमवू शकलेले नाहीत. दिवसभर फक्त घरीच राहा. खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत. घरात रेशनही शिल्लक नाही. यासाठी आम्ही स्थानिक एसएचओला पत्रही लिहिले आहे. जेणेकरून ते आमचा मुद्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतील."
"पैसे कमवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही"
काहीतरी तोडगा काढावा, असे आवाहन नेत्रपाल यांनी माध्यमांच्या माध्यमातून केले. अशा स्थितीत उपाशी राहायची वेळ येईल. घरातील एकही सदस्य बाहेर पडू शकत नाही. तसेच पैसे कमवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. ते म्हणाले, "आमचा मुद्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. जेणेकरून यावर काहीतरी उपाय शोधता येईल आणि उदरनिर्वाह चालू करता येईल."
सीमा हैदर प्रकरणी अलीकडेच दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही तरुण सचिन मीणा यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. बनावट आधार कार्ड बनवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 बनावट आधार कार्डेही जप्त केली आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून आधार कार्ड बनवण्याचे उपकरणही जप्त केले आहे. सचिनच्या सांगण्यावरून ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.