धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 15:10 IST2025-06-01T15:09:47+5:302025-06-01T15:10:12+5:30

एका नर्सच्या निष्काळजीपणामुळे अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाचे बोट चुकून कापले गेले.

Shocking! The nurse cut off the baby's finger while talking on the phone while trying to cut the bandage | धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट

धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट

तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात घडलेली घटना सर्वांना हादरवून टाकणारी आहे. येथे एका नर्सच्या निष्काळजीपणामुळे अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाचे बोट चुकून कापले गेले. ही घटना २४ मे रोजी घडली असून, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

गर्भवती पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर...
मल्लीपलयम गावातील रहिवासी विमलराज यांनी आपल्या गर्भवती पत्नी निवेथाला प्रसूतीसाठी वेल्लोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. काही तासांनंतर या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, बाळाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी असल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने ग्लुकोज देण्याचा निर्णय घेतला.

नर्स फोनवर बोलत असताना कापले गेले बोट
ग्लुकोजची सुई पुन्हा बसवताना, संबंधित नर्सने चुकून टेप कापण्याच्या प्रयत्नात कात्रीने बाळाचे बोटच कापले. पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, या वेळी नर्स मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होती आणि त्यामुळेच ही गंभीर चूक घडली. बाळाच्या वडिलांनी सांगितले की, या घटनेनंतर दीड तास त्यांना त्यांच्या बाळाला पाहण्याचीही परवानगी मिळाली नव्हती.

प्रशासनात खळबळ; चेन्नईत उपचार सुरू
या घटनेनंतर वेल्लोरमधील रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. जखमी नवजात बाळाला तातडीने चेन्नई येथील स्टॅनली रुग्णालयात हलवण्यात आले असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
वेल्लोरच्या जिल्हाधिकारी सुब्बुलक्ष्मी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “जर नर्स फोनवर बोलत असल्याचे सिद्ध झाले, तर तिच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच, या प्रक्रियेसाठी कात्रीची आवश्यकता नव्हती, ती काळजीपूर्वक हातानेही पार पाडता आली असती.”

Web Title: Shocking! The nurse cut off the baby's finger while talking on the phone while trying to cut the bandage