धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:26 IST2025-11-12T19:26:25+5:302025-11-12T19:26:43+5:30

Punjab Police Road Rage: पंजाब पोलीस एस्कॉर्ट जीपने उड्डाणपुलावर निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हूडा यांच्या कारला जाणीवपूर्वक धडक दिली. निवृत्त जनरलकडून पोलिसांच्या अरेरावीवर तीव्र संताप व्यक्त. संपूर्ण घटनेचा तपशील.

Shocking! The arrogance of the 'VIP' escort on the Zirakpur flyover; Punjab Police jeep hit the car of a retired Lieutenant General and fled... | धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...

धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...

झिरकपूर: पंजाब पोलिसांच्या 'VIP' सुरक्षेत असलेल्या एका एस्कॉर्ट जीपने वाहतूक कोंडीत केवळ तीन सेकंदांचा विलंब झाल्यामुळे, निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हूडा यांच्या कारला जाणीवपूर्वक धडक देऊन पळ काढल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे.

बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झिरकपूर उड्डाणपुलावरून जात असताना ही घटना घडली. लेफ्टनंट जनरल हूडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन सायरन वाजवणाऱ्या पोलीस जीप्स 'VIP' ला एस्कॉर्ट करत त्यांच्या मागून येत होत्या. हूडा यांनी तत्काळ गाडी हळू करून मार्ग दिला, मात्र वाहतुकीमुळे 'VIP' गाडीला पुढे जाण्यासाठी काही सेकंदांचा विलंब झाला. यामुळे चिडलेल्या शेवटच्या एस्कॉर्ट जीपच्या चालकाने डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना मुद्दाम उजवीकडे वळण घेतले आणि हूडा यांच्या कारच्या पुढील भागाला धडक दिली. कारला नुकसान पोहोचवल्यानंतरही त्याने कोणतीही पर्वा न करता वेगाने गाडी पुढे नेली.

"वर्दी आणि संस्थेच्या प्रतिष्ठेला कलंक"
या संतापजनक कृत्यावर लेफ्टनंट जनरल हूडा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "हा केवळ अपघात नव्हता, तर ते जाणीवपूर्वक केलेले कृत्य होते. गर्दीच्या रस्त्यावर आमच्या वैयक्तिक सुरक्षिततेचीही त्यांनी काळजी घेतली नाही," असे ते म्हणाले.

"ज्याने कायद्याचे रक्षण करायचे, त्याची ही अरेरावी आणि कायद्याला न जुमानण्याची वृत्ती संस्थेच्या वर्दीला आणि प्रतिष्ठेला डाग लावणारी आहे," अशा कठोर शब्दांत त्यांनी पंजाब पोलिसांच्या या कृत्याचा निषेध केला आहे. या घटनेमुळे पोलीस ताफ्याच्या 'VIP' संस्कृतीवर आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Web Title : पंजाब पुलिस एस्कॉर्ट ने सेवानिवृत्त जनरल की गाड़ी को टक्कर मारी, फरार

Web Summary : पंजाब पुलिस के वीआईपी एस्कॉर्ट ने झिरकपुर फ्लाईओवर पर सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल हुड्डा की कार को जानबूझकर टक्कर मार दी। हुड्डा ने लापरवाही की निंदा की, वीआईपी संस्कृति पर प्रकाश डाला और पुलिस जवाबदेही पर सवाल उठाया। घटना सत्ता के दुरुपयोग पर गंभीर चिंता जताती है।

Web Title : Punjab Police Escort Rams Retired General's Car, Flees Scene

Web Summary : A Punjab Police VIP escort deliberately rammed into retired Lt. Gen. Hooda's car on a busy flyover after a slight delay. Hooda condemned the reckless act, highlighting the VIP culture and questioning police accountability. The incident raises serious concerns about abuse of power.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.