धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 20:09 IST2025-10-31T20:09:11+5:302025-10-31T20:09:44+5:30
कर्नाटक पोलिसांनी बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राध्यापक बी.सी. मैलारप्पा यांना एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक केली.

धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकपोलिसांनी शुक्रवारी बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रोफेसर बीसी मैलारप्पा यांना एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि तिच्या जीवाला धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटक केली.
पीडितेच्या दोन तक्रारींनंतर बसवेश्वरनगर पोलिसांनी ही अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. २०२२ मध्ये ती मैलारप्पा यांच्या संस्थेत काम करत असताना त्यांच्या संपर्कात आली. आरोपीने तिच्या एकाकीपणाचा फायदा घेतला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली, असा आरोप महिलेने केला आहे.
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
या प्राध्यापकाने त्या महिलेला मेसेज पाठवण्यास आणि तिच्याकडून सहकार्याची मागणी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. महिलेने बसवेश्वरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस प्रकरणाचा तपास करत असताना, तिने कामाक्षीपाल्य पोलिस ठाण्यात दुसरी तक्रार दाखल केली, तिला मैलारप्पा विरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे.