शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:25 IST

एडीआरने २७ राज्य विधानसभा, तीन केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील ६४३ मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला.

नवी दिल्ली : देशातील जवळपास ४७ टक्के (३०२) मंत्र्यांवर गुन्हेगारी प्रकरणे दाखल असून, त्यामध्ये खून, अपहरण आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे, असे निवडणूक हक्क संस्था असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या विश्लेषणातून समोर आले आहे.

हा अहवाल केंद्र सरकारने नुकतेच सादर केलेल्या त्या तीन विधेयकांच्या पार्श्वभूमीवर आला आहे, ज्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेस पात्र असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये ३० दिवस सलग अटक किंवा तुरुंगवास झाल्यास पदावरून हटवण्याची तरतूद आहे. एडीआरने २७ राज्य विधानसभा, तीन केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील ६४३ मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. त्यापैकी ३०२ मंत्र्यांवर (४७ टक्के) गुन्हेगारीचे खटले दाखल आहेत. त्यात १७४ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

केंद्रीय मंत्र्यांवर किती गुन्हे?७२ केंद्रीय मंत्र्यांपैकी २९ (४०%)  मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. १९ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यांमध्ये, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पुदुचेरी या ११ विधानसभांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले आहेत. याउलट, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, नागालँड आणि उत्तराखंडमधील मंत्र्यांनी स्वतःवर एकही गुन्हेगारी खटला नोंदवलेला नाही.

देशातील सर्वात श्रीमंत मंत्री नेमके कोण आहेत? डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी  (टीडीपी)     ५,७०५ कोटी        डी.के. शिवकुमार (काँग्रेस) १,४१३ कोटीएन. चंद्राबाबू नायडू (टीडीपी)   ९३१ कोटीनारायण पोंगुरु (टीडीपी)  ८३४ कोटीसुरेश बी.एस (काँग्रेस)  ६४८ कोटी

महाराष्ट्रातील किती मंत्र्यांवर गुन्हे दाखल? आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेतील मंत्र्यांवर सर्वाधिक (८८ टक्के) गुन्हे दाखल आहेत. तामिळनाडूतील ८७ टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातील ४१ मंत्र्यांपैकी २५ (६१ टक्के) मंत्र्यांवर गुन्हे दाखल असून, १६ (३९ टक्के) मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

अब्जाधीश मंत्री किती? देशभरातील मंत्र्यांची सरासरी मालमत्ता ३७.२१ कोटी रुपये असून, सर्व ६४३ मंत्र्यांची एकूण मालमत्ता २३,९२९ कोटी रुपये आहे. ६४३ पैकी ३६ मंत्री हे अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश ८ मंत्री कर्नाटकातील आहेत. यानंतर आंध्र प्रदेशमधील ६ आणि महाराष्ट्रातील ४ मंत्री अब्जाधीश आहेत. केंद्रातील सहा मंत्री अब्जाधीश आहेत. ८ (२० टक्के) इतक्या सर्वाधिक महिला मंत्री पश्चिम बंगालमध्ये आहेत. महाराष्ट्रात ४ महिला मंत्री आहेत. ५१ ते ६० या वयोगटातील सर्वाधिक २४१ मंत्री देशात आहेत. ८१ ते ९० वयोगटातील २ मंत्री आहेत. तर २५ ते ३० वयोगटातील ४ मंत्री आहेत.