शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

धक्कादायक! मिरवणूक पाहायला गेलेल्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 3:37 PM

उत्तर प्रदेशमधल्या सिद्धार्थनगरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सिद्धार्थनगरमधल्या चिल्हिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षांच्या निरागस मुलीवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार करण्यात आला आहे.

सिद्धार्थनगर- उत्तर प्रदेशमधल्या सिद्धार्थनगरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सिद्धार्थनगरमधल्या चिल्हिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षांच्या निरागस मुलीवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार करण्यात आला. ती चिमुकली रात्री मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर गेली असता तिच्यावर हा प्रसंग ओढावला.सहा वर्षांच्या या चिमुकलीवर गावातीलच एका व्यक्तीनं बलात्कार केला. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली. तर गेल्या काही दिवसांपूर्वीही उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या सिव्हिल लाइन परिसरात एका महिलेवर सतत दोन महिने दोघांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याचाही प्रकार उघडकीस आला होता. 23 वर्षांच्या महिलेवर दोन महिने सातत्यानं दोघांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात त्या पीडितेनं स्वतःचे काका आणि अन्य एका व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असली तरी बलात्काराचे सत्र थांबण्यास तयार नाही. उत्तर प्रदेशातील इटा येथे सोमवारी एका विवाह सोहळ्यास पालकांसह गेलेल्या सात वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी 19 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

बलात्कारांत वाढ भारतात पंधरा मिनिटाला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार बालकांवरील अत्याचारांच्या प्रकरणात २०१५ पेक्षा २०१६मध्ये ८२ टक्के वाढ झाली. अत्याचार होण्याचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात आहे. देशातील एकूण गुन्ह्यांपैकी १५ टक्के गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये घडतात. गुजरातमधील सुरतमध्येही ११ दिवसांपूर्वी एका बालिकेचा मृतदेह मिळाला होता. तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. अद्याप तिची ओळख पटलेली नाही.

टॅग्स :MolestationविनयभंगRapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेश