Shocking News : कारमध्ये हेल्मेट घातलं नाही म्हणून ट्रॅफिक पोलिसानं कापलं 500 रुपयांचं चलान! जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:26 IST2022-04-27T16:23:56+5:302022-04-27T16:26:41+5:30
ही अजब घटना केरळमधील तिरुअंतपुरम येथे घडली.

Shocking News : कारमध्ये हेल्मेट घातलं नाही म्हणून ट्रॅफिक पोलिसानं कापलं 500 रुपयांचं चलान! जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण
हेल्मेट न घातल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी एका कार मालकाला चक्क 500 रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना घडली आहे. ही अजब घटना केरळमधील तिरुअंतपुरम येथे घडली. मात्र, ही वाहतूक पोलिसाकडून (Kerala Traffic Police) झालेली चूक आहे. पण, कार माल अजीत ए (Ajith A) यांना ही चूक दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा लागणार आहे. अजित यांच्याकडे मारुती ऑल्टो (Maruti Alti) कार आहे.
ट्रॅफिक पोलिसांनी कापलं 500 रुपयांचं चलान -
ट्रॅफिक पोलिसांनी हे चलान 7 डिसेंबर, 2021 रोजी जारी केले आहे. यात, दोन लोक दुचाकी चालवत असल्याचे म्हटले आहे. यात मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातलेले नाही, असे म्हणण्यात आले आहे. याच बरोबर हे वाहन 'मोटर कार' असून संबंधित नोंदणी क्रमांक अजितच्या गाडीचा असल्याचेही चलानमध्ये म्हणण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलीस काय म्हणतात -
या प्रकरणात मोटारसायकलच्या रजिस्ट्रेशनमध्ये काही तरी गडबड झाली असावी, असे वाटते. जसे की चलानसोबत अॅटॅच फोटोत दिसत आहे. यात मोटारसायकलचे शेवटचे दोन अंक सोडून बाकी सर्व गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत. शेवटचे दोन डिजिट 77 ऐवजी 11 आहेत.
याच बरोबर, माध्यमांसोबत बोलताना अजित म्हणाले, की यासंदर्भात आपण मोटार वाहन विभागाकडे तक्रार करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना पोलीस म्हणाले, रजिस्ट्रेशन नंबर सिस्टिममध्ये टाकताना, लिपिकाकडून चूक झालेली असू शकते.