शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

धक्कादायक! गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयकृत बँकांमध्येच अधिक घोटाळे         

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 06:00 IST

देशातील ७१ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणांपैकी ६५ हजार ५०९ कोटींचे घोटाळे

ठळक मुद्देनागरी बँक महासंघ : खासगी, परदेशी बँकाही आघाडीवरचनागरी सहकारी बँकींग क्षेत्रात पाच वर्षात १ हजार झाले आहे गैरव्यवहार

पुणे : नागरी सहकारी बँकांमधे गेल्या पाच वर्षांत तब्बल २२० कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याची माहिती विपर्यस्त असून, घोटाळ्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकाच आघाडीवर असल्याचे आकडे महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघाने दिले आहेत. केवळ २०१८-१९ या वर्षांत देशातील ७१ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणांपैकी ६५ हजार ५०९ कोटींचे घोटाळे राष्ट्रीयकृत बँकातच झाल्याचे महासंघाने सांगितले. नागरी सहकारी बँकींग क्षेत्रात पाच वर्षात १ हजार गैरव्यवहार झाले आहे. त्यात २२० कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेच्या हवाल्याने प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताचे नागरी सहकारी बँक महासंघाने खंडन केले आहे. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार नागरी बँकींग क्षेत्रात देशपातळीवर १९१८-१९ या वर्षात १८९ प्रकरणांमधे १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यात पुणे स्थित कॉसमॉस बँकेतील सायबर हल्ल्यातील ९४ कोटी रुपयांचा समावेश आहे. मात्र, याला घोटाळा म्हणता येणार नाही. ही रक्कम वजा केल्यास १८० प्रकरणांमधे ३३ कोटी ७० लाख रुपये गुंतले आहेत. सरासरी १८ लाख रुपये प्रत्येक प्रकरणामधे गुंतले आहेत. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत बँकामधे ९५ हजार ७०० कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. यातील प्रकरणांची संख्या ५ हजार ७४३ इतकी असून, प्रत्येक प्रकरणामधे सरासरी १७ कोटी रुपये गुंतले आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्वाधिक २५ हजार ४०० कोटी रुपयांचा वाटा आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) राष्ट्रीयकृत बँकांमधील घोटाळा ७१ हजार ५०० कोटी रुपयांचा होता. केंद्र सरकारने त्यांना ७० हजार कोटी रुपयांची भांडवली मदत केली होती. त्यापूर्वीच्या (२०१७-१८) आर्थिक वर्षात घोटाळ््याची रक्कम ४१ हजार १६७ कोटी रुपये होती. केवळ दीड वर्षांत ही रक्कम दुप्पट झाली. राष्ट्रीयकृत, खासगी, परदेशी आणि इतर आर्थिक संस्थांमधील घोटाळ््यांची तुलना केल्यास नागरी सहकारी बँकांचे प्रमाण अल्प ठरते. केवळ नागरी बँकांची प्रसिद्धी देणे योग्य नसल्याचे मत महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले. --रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१८-१९ ची गैरव्यवहारांची जाहीर केलेली आकडेवारीबँका                          प्रकरणांची संख्या        गुंतलेली रक्कम (कोटीत)        टक्के राष्ट्रीय बँका                 ३७६६                                ६४,५०९.                           ९०खासगी बँका                २०९०                               ५५१५.१०                          ७.६९परदेशी बँका                 ७६२                                 ९५५.३०                            १.३३आर्थिक संस्था               २८                                  ५५३.४०                           ०.२१नागरीबँक                    १८१                                 १२७.७०                            ०.२१एकूण                          ६८२७                              ७१,६६१.४०                       १००                

टॅग्स :PuneपुणेbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक