धक्कादायक! विषारी गीझर गॅसमुळे पतीचा मृत्यू, काही मिनिटांतच पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 08:31 IST2026-02-09T08:30:17+5:302026-02-09T08:31:04+5:30

पतीच्या निधनानंतर पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. पत्नीने लिहिलेली एक नोट पोलिसांना सापडली आहे. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Shocking! Husband dies due to toxic geyser gas, wife takes extreme step within minutes | धक्कादायक! विषारी गीझर गॅसमुळे पतीचा मृत्यू, काही मिनिटांतच पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

धक्कादायक! विषारी गीझर गॅसमुळे पतीचा मृत्यू, काही मिनिटांतच पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

बंगळुरूमध्ये गीझर गॅसच्या विषबाधेने एका पुरूषाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. पतीच्या मृत्यूने हैराण होऊन तिने काही तासांतच आत्महत्या केली. पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. मृतांची ओळख ४८ वर्षीय राजू आणि त्यांची पत्नी ४२ वर्षीय मीना राजू अशी झाली आहे. या जोडप्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा आहे.

काॅंग्रेस खासदार गोगोईंवर पाकशी संबंधाचा आराेप; आसामचे CM हिमंता बिस्वांचा खळबळजनक दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. मीना बंगळुरूमधील एका खाजगी बँकेत काम करत होती. शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी परत येताच राजू आंघोळीसाठी गेला होता. बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही तेव्हा त्याच्या मुलाने त्याला हाक मारली. मात्र, वारंवार विचारपूस करूनही बाथरूममधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मुलाने जवळच्या लोकांना माहिती दिली. दरवाजा तोडल्यानंतर लोकांना बाथरूममध्ये राजू मृतावस्थेत आढळला.

मीनाने धक्कादायक पाऊल उचलले

मुलाने त्याच्या आई मीनाला फोन केला आणि तिला घरी येण्यास सांगितले. यावेळी मीना या ऑफिसमधून निघून आल्या, पण घरी जाण्याऐवजी त्या जक्कासंद्रा येथे पोहोचल्या, तिथे या दाम्पत्याच्या नवीन घराचे काम सुरू होते. त्यानंतर मीना यांनी तिथे आत्महत्या केली. मीना यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, त्या त्यांच्या पतीशिवाय एक मिनिटही राहू शकत नाही. 

ज्यावेळी गीझर सुरू असतो तेव्हा कार्बन मोनोऑक्साइड नावाचा विषारी वायू बाहेर पडतो. हा वायू गंधहीन आणि रंगहीन आहे आणि मर्यादित जागेत श्वास घेतल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. हा वायू राजू यांच्या मृत्यूचे कारण होता.

राजू नेलामंगला येथे भाड्याच्या घरात राहत होता आणि तेथील बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नव्हते. नेलामंगला टाउन पोलिसांनी राजूच्या मृत्यूप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : गीजर गैस से पति की मौत; पत्नी ने सदमे में की आत्महत्या।

Web Summary : बेंगलुरु में गीजर गैस से एक व्यक्ति की मौत हो गई। सदमे में, पत्नी ने कुछ घंटों बाद आत्महत्या कर ली। राजू और मीना विवाहित थे और उनका एक बेटा था। राजू की खराब वेंटिलेशन वाले बाथरूम में मौत हो गई। मीना ने एक सुसाइड नोट छोड़ा जिसमें कहा गया कि वह उसके बिना नहीं रह सकती।

Web Title : Husband dies from gas poisoning; wife commits suicide in despair.

Web Summary : In Bengaluru, a man died from geyser gas poisoning. Overwhelmed by grief, his wife committed suicide hours later. The couple, Raju and Meena, were married with a son. Raju died in a poorly ventilated bathroom. Meena left a suicide note stating she couldn't live without him.