इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:06 IST2025-09-30T13:06:25+5:302025-09-30T13:06:49+5:30
इंजिनियर असलेल्या पतीने राहत्या घरी पत्नीची हत्या करून नंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथील सेक्टर १०ए ...

इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
इंजिनियर असलेल्या पतीने राहत्या घरी पत्नीची हत्या करून नंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथील सेक्टर १०ए पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत दाम्पत्य हे येथील मिलेनियम सिटी सोसायटीमध्ये गेल्या २ वर्षांपासून भाड्याने राहत होतो.
मृत पती आणि पत्नी दोघेही पेशाने इंजिनियर होते. त्यांची ओळख अजय कुमार (३०) आणि स्वीटी शर्मा (२८) अशी पटली आहे. अजय हा मुळचा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील रहिवासी होता. तर स्वीटी शर्मा ही पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील रहिवासी होती. तीन वर्षांपूर्वी दोघांचंही पारंपरिक पद्धतीने लग्न झालं होतं. रविवारी संध्याकाळी अजय याने मित्राला व्हिडीओ कॉल करून आपण जीवन संपवत असल्याचे सांगितले. त्यानंतर मित्राने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत सारं संपलं होतं. पोलिसांना या दामपत्याचे मृतदेह एका खोलीत सापडले. त्यात अजयचा मृतदेह फासाला लटकलेला होता. तर स्वीटीचा मृतदेह जमीनीवर पडलेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी या दाम्पत्यामध्ये भांडण झालं होतं. तसेच अजयने याआधीही भांडणाची माहिती मित्राला दिली होती. अजय याने स्वीटीचा गळा दाबून तिची हत्या केली आणि नंतर स्वत: गळफास घेऊन जीवन संपवले, अशी माहिती प्राथमिक तापामधून समोर आली आहे. आता पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आता पोलीस अजय याचे मित्र आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून अधिक माहिती घेत आहेत.