शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:28 IST

पोलीस तपासानुसार, अपघातानंतर युवकाचा मृतदेह एका ट्रकला अडकला आणि तो महामार्गावर सुमारे ११ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला.

हरियाणातील नारनौल येथे बुधवारी रात्री उशिरा झालेल्या एका अपघाताने संपूर्ण परिसरच हादरला आहे. या अपघातात एका २२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह अपघातस्थळापासून तब्बल ११ किलोमीटर दूर सापडला आहे. पोलीस तपासानुसार, अपघातानंतर युवकाचा मृतदेह एका ट्रकला अडकला आणि तो महामार्गावर सुमारे ११ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला.

दुचाकी डिव्हायडरवर आदळली अन्...मृत तरुणाचे नाव अभिषेक असून, तो महेंद्रगड जिल्ह्यातील चितलांग गावचा रहिवासी आहे.  तो नारनौलमधील एका पेंट कंपनीत काम करत होता. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तो आपला चुलत भाऊ प्रमोदसह दुचाकीवरून गावाकडे निघाला होता. लहरोदा गावाजवळ त्यांची दुचाकी डिव्हायडरवर आदळली. या धडकेत अभिषेक रस्त्यावर पडला, तर प्रमोद दुसऱ्या बाजूला फेकला गेला. स्थानिक नागरिकांनी जखमी प्रमोदला तत्काळ नागरिक रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारानंतर त्याला शुद्ध आली.

अभिषेक अपघातानंतर लाल रंगाच्या ट्रकला अडकला -दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी मंढाणा गावाजवळ हेल्मेट घातलेल्या एका युवकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडल्याने खळबळ उडाली. तो अभिषेक होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, समोर आले की, अभिषेक अपघातानंतर लाल रंगाच्या ट्रकला अडकला होता आणि ट्रकचालकाने वाहन थांबवण्याऐवजी पुढे नेले.

सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी सतबीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध शोधमोहीम सुरू केली आहे. या भयावह घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Horrific Accident in Narnaul: Youth's Body Dragged 11 km

Web Summary : A 22-year-old died in Narnaul after his motorcycle hit a divider. His body got stuck to a truck and was dragged for 11 kilometers. Police are searching for the unidentified truck driver. The incident raises serious road safety concerns.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस