शोभा डे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

By Admin | Published: August 9, 2016 07:10 AM2016-08-09T07:10:37+5:302016-08-09T07:42:49+5:30

ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचं केवळ एकच लक्ष्य आहे. रियोला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे

Shobha De will once again be in the vicinity | शोभा डे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

शोभा डे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ : ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल ट्विट करत प्रसिद्ध लेखिका शोभा डे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. वादग्रस्त ट्विट करण्यात माहिर असलेल्या शोभा डे यांनी आज ऑलिम्पिक मध्ये खेळण्यासाठी भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी गेलेल्या खेळाडूबाबत ट्विट करत वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.

शोभा डे आपल्या ट्विटमध्ये लिहतात ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचं केवळ एकच लक्ष्य आहे. रियोला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे, असं ट्विट शोभा डेंनी केलं आहे. शोभा डेंच्या या ट्विटमुळे नेटिझमने त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड होत आहे.

यापुर्वीही, मल्टिप्लेक्समधील किमान एका पडद्यावर ‘प्राइम टाइम’मध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात शोभा डेंनी टिष्ट्वटरवर उपरोधिक भाष्य केले होते. 

 

Web Title: Shobha De will once again be in the vicinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.