बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी 'सुलेमान सेना' केली, 'शकुनीमामा' बुडवणार; राणांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:04 IST2022-05-11T14:56:33+5:302022-05-11T15:04:51+5:30

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

shivsena now become Uddhav Thackerays Suleman Sena and Shakunimama will drown the state government says ravi Rana | बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी 'सुलेमान सेना' केली, 'शकुनीमामा' बुडवणार; राणांचा खोचक टोला

बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी 'सुलेमान सेना' केली, 'शकुनीमामा' बुडवणार; राणांचा खोचक टोला

नवी दिल्ली-

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू असून उद्धव ठाकरेंना फक्त माझा फ्लॅट दिसला, अनिल परबांचे १५ फ्लॅट मुंबईत आहेत, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. तसंच ज्यादिवशी शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली त्याच दिवशी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली. त्याच दिवशी सर्व शिवसैनिक पोरके झाले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची 'सुलेमान सेना' करुन टाकली, असा हल्लाबोल रवी राणा यांनी केला. 

मुंबईत अनिल परबांचे १५ फ्लॅट; रवी राणांचा गंभीर आरोप, आता नवी दिल्लीत हनुमान चालीसा पठण!

"उद्धव ठाकरेंची १४ मे रोजी सभा आहे. त्यात ते नक्कीच आम्ही मर्द आहोत. मर्दासारखं काम करतो वगैरे बोलतील. पण त्यांनी एका महिला खासदाराला तुरुंगात टाकून तिला चुकीची वागणूक देऊन नामर्दपणाचं काम केलं आहे. याला मर्दपणा म्हणत नाहीत. हनुमान चालीसा पठण करण्याऱ्यांच्या विरोधात राजद्रोहाचं कलम लावलं जातं. हे पाहून आज बाळासाहेबांना खूप दु:ख होत असेल. बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी सुलेमान सेना करुन टाकली आहे", असं रवी राणा म्हणाले. 

संजय राऊतांचा 'शकुनीमामा' असा उल्लेख
"बाळासाहेबांच्या शिवसेनेची सुलेमान सेना करुन टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंना एक शकुनीमामा घेऊन बुडणार आहे. एक वेळ अशी येईल की शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास कुणी तयार होणार नाही", असं रवी राणा म्हणाले. शकुनीमामा कोण असं विचारण्यात आलं  असता नवनीत राणा यांनी ते सध्या शिवसेनेचे राज्यसभेचे सदस्य आहेत असं उत्तर देत नाव न घेता संजय राऊतांवर टीका केली. 

१४ मे रोजी नवी दिल्लीत हनुमान चालीसा पठण
"ज्या दिवशी शिवसेनेची सभा आहे. त्याच दिवशी म्हणजेच १४ मे रोजी नऊ वाजता नवी दिल्लीत प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि महाआरती करणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येवो यासाठी प्रार्थना करणार आहे", असं रवी राणा यांनी यावेळी सांगितलं. 

Web Title: shivsena now become Uddhav Thackerays Suleman Sena and Shakunimama will drown the state government says ravi Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.