शिवजयंतीची शहरात जय्यत तयारी
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:45+5:302015-03-08T00:30:45+5:30
शहर भगवेमय : मिरवणुकीत ११ चित्ररथांचा सहभाग

शिवजयंतीची शहरात जय्यत तयारी
श र भगवेमय : मिरवणुकीत ११ चित्ररथांचा सहभागनाशिक : शहर परिसरामध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली असून, सर्वत्र भगवेमय वातावरण झाले आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील चौकाचौकांमध्ये विविध पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांच्या वतीने आकर्षक व्यासपीठ, विद्युत रोषणाई व भगवे झेंडे लावून सजावट करण्यात आली आहे. शहरातील मेनरोड, पंचवटी कारंजा या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़शहरातील चौकाचौकांमध्ये विविध तरुण मंडळांच्या वतीने शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू आहे़ ठिकठिकाणी छोटे मंडप, स्टेज उभे करण्यात आले असून, विविधरंगी फुले, विद्युत रोषणाईने ते सजविण्यात आले आहेत़ मेनरोड, पंचवटी परिसरातील मुख्य हमरस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शनिवारी सायंकाळनंतर परिसर उजाळून गेला होता़शिवजयंतीनिमित्त दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने, घर, सोसायटी, व्यावसायिक संकुल आदि ठिकाणी भगवे ध्वज लावल्याने सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात येणार्या प्रमुख मिरवणुकीत ११ चित्ररथ सहभागी होणार असून शिवजयंती उत्साहात व शांततेत साजरी व्हावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी) --इन्फो--मिरवणूकीचा मार्गउद्या (दि. ८) तिथीनुसार साजर्या होत असलेल्या शिवजयंतीची मिरवणूक शहरातील वाकडी बारव ते पंचवटी या पारंपरिक मार्गानेच होणार आहे़ यासाठी पोलिसांच्या वतीने मंडळांच्या बैठका घेण्यात आल्या असून, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे़ वाकडी बारव, हमीद चौक, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, गावकरी प्रेस, रेडक्रॉस, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक असा मिरवणुकीचा मार्ग असून, या मार्गावरील वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे़--इन्फो--मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनातशहरातून निघणार्या शिवजयंती मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यासाठी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, १२० पोलीस कर्मचारी, ६० महिला पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, स्ट्रायकिंग फोर्स तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तैनात असणार आहेत़फोटो :- ०७ पीएचएमआर ९४ किंवा ९७आज (दि. ८) तिथीनुसार साजर्या होणार्या शिवजयंतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिवजयंतीसाठी मेनरोड येथे उभारण्यात आलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा.फोटो :- ०७ पीएचएमआर ९२शिवजयंतीची बाजारात विक्रीसाठी आलेल्या महाराजांच्या विविध प्रतिमा़