Maharashtra Politics: “हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण, अदानी समूहाच्या घोटाळ्यात भाजपचा हात”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:37 PM2023-02-02T12:37:15+5:302023-02-02T12:39:06+5:30

Maharashtra Politics: अदानी समूहाने केलेल्या घोटाळ्यावर आम्ही संसदेत आवाज उठवणार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

shiv sena thackeray group mp sanjay raut big allegations over bjp and modi govt after hindenburg report on adani group | Maharashtra Politics: “हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण, अदानी समूहाच्या घोटाळ्यात भाजपचा हात”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: “हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण, अदानी समूहाच्या घोटाळ्यात भाजपचा हात”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Next

Maharashtra Politics: अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालामुळे अदानी समूह चांगलाच अडचणीत आला आहे. या अहवालामुळे अदानी समूहाचे प्रचंड मोठे नुकसाना झाले. अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर कमालीचे घसरले. याचा फटका गुंतवणूकदारांनाही बसला. यातच अदानी समूहाने २० हजार कोटींचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण आहे. अदानी समूहाने केलेला घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा असून, असा घोटाळा झाला नव्हता. त्यात सत्ताधारी पक्षाचा थेट संबंध आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्प, अदानी समूहाबाबत आलेला हिंडेनबर्गचा अहवाल यांसह अन्य विषयांवर परखड शब्दांत मते मांडली. उद्योगपतीचे जे प्रकरण आले. अदानीच्या सिंगापूर आणि मॉरिशमध्ये शेल कंपन्या आहेत. हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांनी आवाज का उठवला नाही? तपास यंत्रणा का बोलत नाही? केवळ विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठीच तपास यंत्रणा आहेत काय? अशी विचारणा संजय राऊतांनी केली. 

अदानी समूहाच्या घोटाळ्यावर संसदेत आवाज उठवणार

अदानी समूहाने केलेल्या घोटाळ्यावर आम्ही संसदेत आवाज उठवणार आहोत. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक घेऊन आम्ही आमची रणनीती ठरवणार आहोत. पुढे काय करायचे हे ठरवणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. यावेळी संजय राऊतांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही सडकून टीका केली. जनतेच्या पैशाने २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका कशा लढल्या जातील याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा अर्थसंकल्प आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले.

दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. ज्या मुंबईकडून देशाला सर्वाधिक महसूल मिळतो. त्या मुंबई आणि महाराष्ट्राला बजेटमधून काय मिळाले? अर्थसंकल्प सादर करण्याआधी साऊथ ब्लॉकमध्ये जो गाजर हलवा तयार केला जातो. त्यातील चमचाभर हलवा देखील मुंबईच्या वाट्याला आलेला नाही. मुंबईतील खासदारांच्या अनेक मागण्या होत्या. पण त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले गेले. मुंबईतील खासदारांच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, असेही ते पुढे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group mp sanjay raut big allegations over bjp and modi govt after hindenburg report on adani group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.