शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीऐवजी सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीननं घुसखोरी केली नसती- संजय राऊत

By कुणाल गवाणकर | Updated: February 2, 2021 17:56 IST

शिवसेना नेत्यांचं शिष्टमंडळ आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार

नवी दिल्ली: शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. तसेच खिळे सीमेवर ठोकले असते, तर चीननं घुसखोरी केली नसती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे. तुम्ही अन्नदात्याला दहशतवादी म्हणता. पण तुमची वर्तणूक दहशतवाद्यांपेक्षा वरची आहे, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.मुख्यमंत्र्यांचा आदेश, खासदार संजय राऊत आज गाझीपूर बॉर्डरवर जाणारदिल्लीपेक्षा भारत-चीन सीमेवरील रस्त्यांवर सळ्या लावल्या असत्या, खिळे ठोकले असते, तर चीनी भारतात घुसले नसते, असा चिमटा राऊत यांनी केंद्र सरकारला काढला. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत तिरंग्याचा अपमान झाल्याचा मुद्दा भाजपकडून वारंवार उपस्थित करण्यात येतो. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. 'आम्ही शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत. महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या पाठिशी असल्याचा विश्वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. शेतकरी केवळ स्वत:साठीच नाही, तर आपल्यासाठीही आंदोलन करत आहेत. त्यांच्या लढ्याला बळ देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. हाच तिरंग्याचा सन्मान आहे,' असं राऊत म्हणाले.मुलीच्या साखरपुड्यात राऊतांनी घेतली फडणवीसांची गळाभेट; चंद्रकांत पाटील म्हणाले, “दुष्मन असला तरी…”तुम्हाला शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर अटक झाली तरी आम्ही घाबरत नाही, असं उत्तर राऊत यांनी दिलं. 'दिल्लीत असताना आम्ही शेतकऱ्यांची भेट घेतली नाही, तर परमेश्वर आम्हाला माफ करणार नाही. शिवसेनेचं शिष्टमंडळ शेतकऱ्यांची भेट घेईल. कदाचित पोलीस आम्हाला अडवतील, अटक करतील, लाठ्या चालवतील किंवा मग गोळ्या घातल्या जातील. त्यापलीकडे सरकार काही करू शकत नाही,' असं राऊत पुढे म्हणाले.केंद्र सरकार शेतकऱ्यांना दहशतवाद्यांपेक्षा वाईट वागणूक देत असल्याची टीका त्यांनी केली. 'शेतकऱ्यांना पाठिंबा देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तुम्ही कितीही पोलीस बंदोबस्त वाढवा. आम्ही शेतकऱ्यांची भेट घेणारच. शेतकरी आणि माझ्यामध्ये केवळ एका फोन कॉलचं अंतर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. त्या फोनच्या तारांचे खांब कोसळले आहेत का?' असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना