शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेमुळे राज्यसभेत भाजपाचे टेन्शन वाढले; विधेयक संमतीच्या भूमिकेवर संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 10:06 IST

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचे राज्यसभेत तीन खासदार आहेत. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात भाजपाशी काडीमोड घेण्यात महत्वाची भुमिका असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखिल यापैकीच एक आहेत.

नवी दिल्ली : एनडीएची साथ सोडून महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. यामुळे शिवसेनेचे एकमेव केंद्रीय़ मंत्री असलेले अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता भाजपाने शिवसेनेला एनडीएच्या बैठकीतून डावलले असून लोकसभेतही वेगळी जागा दिली आहे. यामुळे राज्यसभेतही शिवसेना वेगळीच राहणार असल्याचे चित्र आहे. असे झाल्य़ास राज्यसभेत एनडीए पुन्हा अल्पमतात जाणार आहे. 

शिवसेनेचे राज्यसभेत तीन खासदार आहेत. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात भाजपाशी काडीमोड घेण्यात महत्वाची भुमिका असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखिल यापैकीच एक आहेत. यामुळे शिवसेना विधेयक संमतीवेळी भाजपाला मतदान करते की काँग्रेससोबत जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 भाजपा नागरिकता सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडणार आहे. या विधेयकाला विरोध करायचा की मंजुरी द्यायची अशा विवंचनेत शिवसेनेचे खासदार आहेत. राज्यसभेत शिवसेना संख्याबळानुसार काही सहकारी पक्षांच्या नाराजीनंतरही बहुमताच्या जवळ आहे. जदयू ६, आसाम गण परिषद सह पुर्वोत्तरमधील काही पक्ष विधेयकाच्या विरोधात आहेत. अशातच शिवसेनाही एनडीएतून बाहेर पडल्याने भाजपाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

राज्यसभेत एकूण 238 सदस्य आहेत. यापैकी भाजपाने अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या सदस्यांना आपल्या बाजुला वळविले आहे. असे एकूण 113 मते जोडली आहेत. विधेयक संमत करण्य़ासाठी भाजपाला आणखी 7 मतांची आवश्यकता आहे. बिजू जनता दल 7, टीआरएस 6 आणि वायएसआर काँग्रेसला या बाजुने वळविण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. असे झाल्यास भाजपा यावेळी यशस्वी होऊ शकते. 

भाजपाच्या अडचणी काय? राष्ट्रीय नागरिकता संशोधन विधेयक हे लाखो हिंदू लोकांना एनआरसी रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यासाठी अपयश आल्याने तयार करण्यात आले आहे. हे विधेयक न पास झाल्यास भाजपासमोर अन्य कोणताही पर्याय नाही. कारण हे विधेयक आसामनंतर अन्य राज्यांमध्येही लागू करायचे आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतRajya Sabhaराज्यसभा