शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण!; साधुंच्या हत्येवरून शिवसेनेचं योगींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 08:21 IST

पालघर आणि बुलंदशहरमध्ये साधुंच्या हत्या; शिवसेना आणि योगींमध्ये वाकयुद्ध

मुंबई: पालघर साधू हत्येचे आरोपी पकडले गेले तसे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या साधू हत्याकांडाचे आरोपीदेखील अटकेत गेले. कारण दोन्ही राज्ये कायद्याची आहेत. फरक इतकाच की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना प्रत्युत्तर देत राज्यातील भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. साधुंच्या मारेकऱ्यांवर कारवाई करा हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योगींना फोन केला. यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण, असं शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातल्या विरोधी पक्षाच्या वर्तनावर बोट ठेवत शिवसेनेनं राज्य भाजपाला लक्ष्य केलं. 'राजकारणातील मानवी मनाचे हे नवे कंगोरे गमतीचे तितकेच गुंतागुंतीचेही आहेत. जनता गंमत बघत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गुंत्यात पाय अडकवून स्वत:चेच हसे करून घेत आहे. उत्तर प्रदेशची जनता या खेळास मुकली आहे. बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाचा समाचार घेतला आहे.'महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून विझलेल्या कोळशावरील राखुंडी सैरभैर उडावी तसे काही लोकांचे झाले आहे खरे! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक साधू आहेत. त्यांच्या साधुत्वाचा आम्ही नेहमीच आदर केला. महाराष्ट्रात मध्यंतरी दोन साधूंची हत्या जमावाने केली ही अत्यंत दु:खद आणि चीड आणणारी बाब आहे. ज्या गावात ही हत्या झाली ते संपूर्ण गाव भारतीय जनता पक्षाच्या राजकीय अधिपत्याखाली बऱयाच वर्षांपासून आहे, पण अशा प्रसंगात राजकारण नको असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठणकावून सांगितले व 72 तासांत शंभरांवर आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रसंगावर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. भगव्या वस्त्रातील साधूंची हत्या होणे ठीक नाही, ही त्यांची चिंता समजण्यासारखी आहे. साधूंचे मन साधूच जाणतो हे खरे, पण पुढच्या दहा दिवसांतच योगी महाराजांच्या राज्यातच बुलंदशहरमधील देवळातच दोन साधू महाराजांची हत्या झाली. महाराष्ट्रातील साधूंचा मृत्यू जमावाच्या मारहाणीत झाला, तर योगांच्या राज्यात साधूंना गळे चिरून मारले. या साधूंच्या हत्येवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगी महाराजांना फोन केला व चिंता व्यक्त केली. असे प्रसंग राजकारण करण्याचे नसून गुन्हेगारांना एकत्रित येऊन धडा शिकविण्याचे आहेत. आम्ही तुमच्यासोबतच आहोत, गुन्हेगारांना कठोर शासन तुम्ही करालच, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एका कळकळीने सांगितले. संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे. यात कसले आलेय डोंबलाचे राजकारण', अशा शब्दांत शिवसेनेनं बुलंदशहरमधील साधुंच्या हत्येवर भाष्य केलं.'मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगी महाराजांना फोन करून चिंता व्यक्त केली यातही काही लोकांना फक्त राजकारणाचाच वास येत आहे व त्यांनी असे सांगितले की, बुलंदशहरातील घटना वेगळी व महाराष्ट्रातील वेगळी, तुम्ही तुमचा महाराष्ट्र सांभाळा वगैरे विधाने योगी महाराजांच्या कार्यालयातून केल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणजे महाराष्ट्रात एखादी दुर्घटना घडली की, चिंतेचा माहोल निर्माण केला जातो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा केला जातो, पण भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र रक्ताने लथपथ झाली तरी चिंतेची शिंकही कुणी मारायची नाही. भगव्या-भगव्यात व रक्ता-रक्तात फरक करणारे हे मानवी मन गमतीचेच आहे, असे आम्ही म्हणतो ते यासाठीच. बुलंदशहरात जे घडले, त्याआधी दोनेक दिवस इटावा येथे एका ब्राह्मण कुटुंबात पाच जणांची हत्या झाली व त्यातील काहीजण धार्मिक विधी, पूजाअर्चा करून उदरनिर्वाह करणारे होते. म्हणजे तेही एकप्रकारे गरीब साधूच होते, पण बुलंदशहर ते इटावापर्यंत हत्या होऊनही कोणी तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. राज्यपालांच्या घरात बसून अखंड ठिय्या मांडला नाही. शहरी नक्षलवाद्यांचा हा सर्व हैदोस असून सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा इंटरपोलकडे द्यावा, अशी मागणी केली नाही. दिल्लीतून खास हालचाली झाल्या व साधू हत्येबाबत माहिती मागवून राष्ट्रीय गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली, अशी बातमी आमच्या वाचनात आली नाही,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.मोदी यांच्याशी चर्चेनंतर उद्धव यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा?स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, भाविक यांना आपापल्या गावी जाण्यास केंद्राची सशर्त मंजुरी

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना