शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर विषय समित्या सभापतींची निवड बिनविरोध ढोबळे यांची हॅट्ट्रिक : आरोग्य, स्वच्छता सभापतिपदी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

शिरूर : नगर परिषद विविध विषय समितींच्या सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार रघुनाथ पोटे यांनी निवड जाहीर केली. चांगल्या कामाबद्दल रवींद्र ढोबळे यांना तिसर्‍यांदा आरोग्य, स्वच्छता विभागाचे सभापतिपदाची संधी देण्यात आली. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत बांधकाम समिती सभापतिपदासाठी अलका नारायण सरोदे; पाणीपुरवठा, जलविकास व विद्युत समिती सभापतिपदासाठी दादाभाऊ रामदास वाखारे; स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदासाठी रवी ऊर्फ श्याम मनोहर ढोबळे, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी शैला भगवान साळवे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पोटे यांनी निवडणूक वेळेनंतर या चार जणांची सभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर पो

शिरूर : नगर परिषद विविध विषय समितींच्या सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार रघुनाथ पोटे यांनी निवड जाहीर केली. चांगल्या कामाबद्दल रवींद्र ढोबळे यांना तिसर्‍यांदा आरोग्य, स्वच्छता विभागाचे सभापतिपदाची संधी देण्यात आली. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत बांधकाम समिती सभापतिपदासाठी अलका नारायण सरोदे; पाणीपुरवठा, जलविकास व विद्युत समिती सभापतिपदासाठी दादाभाऊ रामदास वाखारे; स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदासाठी रवी ऊर्फ श्याम मनोहर ढोबळे, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी शैला भगवान साळवे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पोटे यांनी निवडणूक वेळेनंतर या चार जणांची सभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर पोटे यांच्यासह सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा सुनीता कालेवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणुकीआधी आघाडी प्रमुख रसिकलाल धारिवाल, अध्यक्ष केशरसिंग परदेशी, सदस्य माऊली पठारे, सभागृहनेते धारिवाल यांच्या बैठकीत उपरोक्त निर्वाचित सभापतींच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. चार वर्षांत प्रत्येकाला संधी मिळेल, या हेतूने निवड करण्यात आली. समिती, सभापती व सदस्य पुढील प्रमाणे : बांधकाम समिती- सभापती- अलका सरोदे, सदस्य- विजय दुगड, जाकिरखान पठाण, अशोक पवार, कविता वाटमारे; पाणीपुरवठा, जलविकास व विद्युत समिती- सभापती- दादाभाऊ वाखारे, सदस्य - अशोक पवार, प्रवीण दसगुडे, महेंद्र मल्लाव, उज्ज्वला बरमेचा; स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती- सभापती, रवी ऊर्फ श्याम ढोबळे; सदस्य- जाकीरखान पठाण, संगीता शेजवळ, अशोक पवार, आबीद शेख; नियोजन विकास गृहनिर्माण, टपरी व झोपडप˜ी पुनर्वसन समिती- सभापती- प्रकाश धारिवाल, सदस्य- विजय दुगड, संतोष भंडारी, महेंद्र मल्लाव, सुवर्णा लटांबळे; महिला व बालकल्याण समिती- सभापती- शैला साळवे, उपसभापती- उज्ज्वला बरमेचा, सदस्य- संगीता शेजवळ, सुवर्णा लटांबळे, कविता वाटमारे; स्थायी समिती - सभापती(पदसिद्ध)- सुनीता कालेवार, सदस्य - प्रकाश धारिवाल, अलका सरोदे, दादाभाऊ वाखारे, रवींद्र ढोबळे, शैला साळवे.
फोटो ओळ : नगर परिषद नवनिर्वाचित विषय समित्यांचे सभापतिपदांचे सत्कारप्रसंगी सभागृहनेते धारिवाल, नगराध्यक्षा कालेवार, निवडणूक निर्णय अधिकारी पोटे व इतर.