शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...ही वेडी आहे, हिच्या मागून चालतो भूतांचा तांडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:48 IST

हिंदू धर्मात महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीवर जाणे अशुभ मानले जाते. असे कृत्य कुणी केल्यास त्या व्यक्तीवर सर्व स्तरांमधून टीका केली जाते. परंतु, टीकेची पर्वा न करता फरीदाबादमध्ये राहणारी २६ वर्षांची पूजा यादव या तरुणीने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक मृतदेहांना स्मशानभूमीत अग्नी दिला आहे.

फरीदाबाद - हिंदू धर्मात महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीवर जाणे अशुभ मानले जाते. असे कृत्य कुणी केल्यास त्या व्यक्तीवर सर्व स्तरांमधून टीका केली जाते. परंतु, टीकेची पर्वा न करता फरीदाबादमध्ये राहणारी २६ वर्षांची पूजा यादव या तरुणीने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक मृतदेहांना स्मशानभूमीत अग्नी दिला आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ती स्वत: अस्थींचे गंगेत विसर्जन करण्यासाठी प्रत्येक आमावास्येला हरिद्वारला जाते. ती स्वत: जाते कारण ते सर्व मृतदेह बेवारस असतात. कुणीही यांची जबाबदारी घेत नसते. पूजा मूळच्या दिल्लीत राहत होत्या. परंतु, सध्या त्यांनी आता मुक्काम फरीदाबादला हलविला आहे. 

मार्च २०२२ मध्ये त्यांच्या सख्ख्या भावाला कुणीतरी गोळी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. हे समजताच धक्क्याने वडील कोमात गेले होते. पूजाने आसपासच्या अनेकांना भावांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करा म्हणून विनंती केली परंतु कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे अखेर पूजाने स्वत: स्मशानभूमीत जाऊन भावावर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी तिला बेवारस मृतदेहांची समस्या किती गंभीर असते, याची कल्पना आली वतिने अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था) 

कोण पुरवतो पैसे?- यासाठी येणारा खर्च पूजा स्वत: करते. पूजाचे आजोबा सैन्यात होते. ते शहीद झाल्यानंतर घरच्यांना पेन्शन मिळते.- त्यातील काही पैसे आजी पूजाला अंत्यसंस्काराच्या कामासाठी देत असते. पूजाचे वडीलही दिल्ली मेट्रोमध्ये नोकरी करतात. - तिचे वडीलही पूजाला या कामासाठी दर महिना १० ते १५ हजारांची मदत करतात. पूजा दररोज १२ ते १५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करते. बेवारस मृतदेह आढळला की हॉस्पिटलमधून पूजाला फोन येतात. 

हल्ल्यात पाय फ्रॅक्चर सध्या मित्र परिवार पूजाला मदत करीत असतो. परंतु, सुरुवातीला स्थिती अशी नव्हती. लोकांनी तिला खूप टोमणे मारले. या मुलीला वेड लागले आहे, असाही प्रचार काही जणांनी सुरू केला होता. ही मुलगी चालते तेव्हा तिच्या मागून भूतांचा तांडा चालत असतो, असेही लोक एकमेकांना सांगत असत. काही लोकांना पूजाचे हे काम अजिबात रुचले नाही. त्यामुळे त्यांनी पूजावर हल्लाही केला होता. त्यात पूजाच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. या घटनेनंतरही पूजा खचली नाही. जोवर मी जिवंत आहे तोवर हे काम करीतच राहणार, असा पूजाचा निर्धार आहे.

टॅग्स :HinduहिंदूSocialसामाजिक