‘ती राहुलसोबत पाच दिवस राहिली, नंतर घरी परतली...’, जावयासह पळून गेलेल्या सासूच्या पतीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:33 IST2025-04-12T16:27:06+5:302025-04-12T16:33:18+5:30
होणाऱ्या जावयासह पळून गेलेल्या सासूबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

‘ती राहुलसोबत पाच दिवस राहिली, नंतर घरी परतली...’, जावयासह पळून गेलेल्या सासूच्या पतीचा धक्कादायक खुलासा
काही दिवसापूर्वी होणार्या जावयासह सासू फरार झाल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणी आता दररोज नवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, पळून जाण्यापूर्वी ती राहुलच्या घरी ५ दिवस राहिली होती, असे समोर आले आहे. जावई आजारी असल्याचे कारण पतीला महिलेने सांगितले होते. यामुळे त्यांना भेटायला जात असल्याचे सांगितले. पण तेव्हा कोणीही विचार केला नव्हता की ती परत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती जावयासह पळून जाईल, असा खुलासा आता पतीने केला आहे.
खळबळजनक! "निळ्या ड्रममध्ये १५ तुकडे..."; चिमुकलीचा फोन येताच पोलीस हादरले
सध्या दोघेही फरार आहेत. पोलिसांना यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. त्यांचे शेवटचे लोकेशन उत्तराखंडमधील रुद्रपूरजवळ सापडले. महिलेचा पती जितेंद्रने सांगितले की, १ मार्च रोजी त्याच्या पत्नीने सांगितले की ती तिचा भावी जावई राहुलच्या घरी जात आहे. कारण तो आजारी आहे. जितेंद्रला वाटले की त्याची पत्नी फक्त त्याची तब्येत विचारण्यासाठी जात आहे, पण वास्तव काही वेगळेच निघाले. ती पाच दिवस राहुलच्या घरी एकटीच राहिली.
पाच दिवसांनी ती महिला गावी परतली पण राहुलसोबत आली होती. राहुलने त्या महिलेला गावातील प्राथमिक शाळेजवळ सोडले आणि नंतर निघून गेला. त्यावेळी कोणालाही काहीही संशय आला नाही, पण दुसऱ्या दिवशी दोघांनीही पळून गेले.
पोलिसांसाठी एक आव्हान
महिलेच्या पतीने पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये काम राहुल करत होता हे दोघांचे शेवटचे लोकेशन होते. पण पोलिसांना अजूनही त्याला अटक करण्यात यश आलेले नाही. दोघांचेही फोन बंद असल्याचे दिसून येत आहे.
हे प्रकरण मांद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावचे आहे. जितेंद्र कुमार यांचे कुटुंब येथे राहते. घरी बायको आणि मुलगी आहे. मुलीचे लग्न छर्रा परिसरातील राहुल याच्यासोबत ठरले. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या. पण लग्नाच्या नऊ दिवस आधी, वर त्याच्या होणाऱ्या सासूसोबत पळून गेला.