"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 20:46 IST2025-06-29T20:45:24+5:302025-06-29T20:46:50+5:30
कोलकात्यातील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराने पश्चिम बंगालमधील राजकारण ...

"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार!
कोलकात्यातील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराने पश्चिम बंगालमधील राजकारण जबरदस्त तापले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकार टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहे. यातच आता, या प्रकरणावरून तृणमूल काँग्रेसचे दोन खासदार कल्याण बॅनर्जी आणि महुआ मोइत्रा आपसात भिडल्याचे दिसत आहे. त्यांच्यातील हा वाद आता थेट त्यांच्या खासगी आयुष्यापर्यंत पोहोचला आहे.
कल्याण बॅनर्जी यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून थेट तृणमूल काँग्रेसविरोधाच (TMC) विधान केले होते. मात्र, हे कल्याण बॅनर्जी यांचे वैयक्तीक विचार असल्याचे पक्षाने म्हटले होते. यावर, महुआ मोइत्रा यांनी कल्याण बॅनर्जी यांच्या विधानाचा निषेध केला. यानंतर, आता कल्याण बॅनर्जी यांनी मुहआ यांच्यावर पलटवार केला आहे.
काय म्हणाले, कल्याण बॅनर्जी? -
महुआ मोईत्रा यांच्या पिनाकी मिश्रा यांच्यासोबतच्या लग्नावर टीका करताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, "महुआ हनिमूनवरून परतल्या आणि थेट माझ्याशी भांडायला आल्या. त्या मला महिलाविरोधी म्हणत आहे. पण सत्य हे आहे की, महुआ यांनी त्यांचे ४० वर्षांचे लग्न मोडून. ६५ वर्षांच्या पुरुषासोबत लग्न केले. ज्या महिलेचे घर त्यांनी तोडले, त्या महिलेला वाईट वाटले नसेल?
कोलकाता सामूहिक बलात्कारावरून उपस्थित केला होता सवाल -
तत्पूर्वी कोलकाता सामूहिक बलात्कारासंदर्भात भाष्य करताना कल्याण बॅनर्जी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर प्रश्न उपस्थित केला होता. "TMC चे काही नेते अशा प्रकारच्या गुन्हेगारांना वाचवण्यात मदत करतात. निशेषतः 2011 नंतर, सत्तेत आलेल्या नेत्यांचे नावही अशा गुन्ह्यात समोर येते, असे कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले होते.
I completely disagree with the post made by @AITCofficial on X. Are they indirectly supporting the leaders who are shielding these criminals? Mere academic statements won't bring any real change unless immediate action is taken against those leaders directly responsible. What's…
— Kalyan Banerjee (@KBanerjee_AITC) June 28, 2025
मुहआ यांनी दिली पक्षाची साथ -
कल्याण बॅनर्जी यांच्याशिवाय, TMC खासदार मदन मिश्रा यांनीही संबंधित सामूहिक बलात्कार प्रकरणावर वादग्रस्त विधान करत, "जर पीडिता कुणालाही न सांगता एकटीच कॉलेजला गेली नसती," असे म्हटले होते. कल्याण बॅनर्जी आणि मदन मिश्रा यांच्या विधानांपासून तृणमूल काँग्रेसने स्वतःला दूर ठेवले. यावर महुआ यांनीही टिप्पणी करत, पक्षाला पाठिंबा दिला आणि ही विधाने घृणास्पद असल्याचे म्हटले होते.
Misogyny in India cuts across party lines. What differentiates @AITCofficial is that we condemn these disgusting comments no matter who makes them. https://t.co/2AQ59fQK4w
— Mahua Moitra (@MahuaMoitra) June 28, 2025