शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ट्रम्प असो किंवा 'मित्रों' असो, अहंकार हा घातकच; उत्तर प्रदेशातील पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 3:44 PM

या निकालानंतर मला फक्त माझे मित्र योगी आदित्यनाथ यांच्यासाठी वाईट वाटत आहे.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा झटका बसल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे. ट्रम्प असो, 'मित्रों' असो किंवा कोणताही विरोधी पक्ष नेता असो, अहंकार हा प्रत्येकासाठी घातक असतो, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकांचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतच भाजपाचा धुव्वा उडाला. या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमध्ये सिन्हा यांनी म्हटले आहे की, या निकालानंतर मला फक्त माझे मित्र योगी आदित्यनाथ यांच्यासाठी वाईट वाटत आहे. त्यांना घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अतिआत्मविश्वासामुळे आमचा पराभव झाल्याचे त्यांचा मुद्दा अगदी योग्य आहे. मी वारंवार हेच सांगत आलो आहे की, लोकशाही राजकारणात अहंकार, तापटपणा आणि अतिआत्मविश्वास हे तुमचे सर्वात मोठे शत्रू असतात. मग ते कोणीही असो. ट्रम्प असो, 'मित्रों' असो किंवा कोणत्याही विरोधी पक्षाचा नेता असो. सिन्हा यांच्या ट्विटमधील 'मित्रों' या शब्दाचा रोख अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. सिन्हा यांनी यापूर्वीही अनेक जाहीर व्यासपीठांवरून नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि धोरणांवर टीका केली आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला. भाजपाचा बालेकिल्ला उत्तर प्रदेशातच बसलेल्या पराभवाच्या झटक्यामुळे केंद्रीय नेतृत्वालाही मोठा धक्का बसला आहे. पुढील लोकसभा निवडणुकांसाठी ही धोक्याची घंटा मानले जाते. गोरखपूरमधून आदित्यनाथ पाच वेळा लोकसभेवर गेले होते. त्यापूर्वी महंत अवैद्यनाथ तीन वेळा जिंकले होते. २७ वर्षांनंतर भाजपाची ही जागा गेली. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रवीण कुमार निषाद यांनी भाजपाचे उपेंद्र दत्त शुक्ला यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. फुलपूरमध्ये सपाचे नागेंद्र सिंग पटेल यांनी भाजपाचे कशलेंद्र सिंग पटेल यांचा ५९ हजार मतांनी पराभव झाला. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा