शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:52 IST

Shashi Tharoor vs Congress: ऑपरेशन सिंदूरबाबत पीएम मोदींचे कौतुक केल्याबद्दल शशी थरुर यांच्यावर पक्षातूनच जोरदार टीका होत आहे.

Shashi Tharoor vs Congress: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी(दि.२५) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवअनंतपुरमचे खासदार शशी थरुर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारंवार कौतुक केल्याबद्दल टीका केली. खरगेंच्या टीकेने थरुर आणि काँग्रेसमधील मतभेद उघड्यावर आले आहेत. दरम्यान, खरगेंच्या टीकेनंतर आता थरुर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पलटवार केला. 

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?आज पत्रकार परिषदेत बोलताना खरगे म्हणाले, "शशी थरुर यांचे इंग्रजी खूप चांगले आहे, म्हणूनच त्यांना काँग्रेस कार्यकारिणीत ठेवले आहे. मी गुलबर्गा येथे म्हटले होते की, आम्ही एका सुरात बोलतो, आम्ही देशासाठी एकत्र उभे राहतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही एकत्र उभे राहिलो. आमच्यासाठी देश आधी येतो, पण काही लोकांसाठी मोदी आधी येतात, देश नंतर येतो," अशी बोचरी टीका खरगेंनी केली. 

शशी थरुर यांचा पलटवारशशी थरुर यांनी आपल्या X पोस्टमध्ये इंग्रजीत एक संदेश शेअर केला, ज्याचा अर्थ, "उडण्यासाठी कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. पंख तुमचे आहेत, पण आकाश सर्वांचे आहे," अशाप्रकारची पोस्ट थरुर यांनी केली आहे. थरुर यांची पक्षावरील नाराजी याद्वारे स्पष्ट होते. 

थरुर यांची ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी काही शिष्टमंडळे परदेशात पाठवली होती. या शिष्टमंडळात शशी थरुर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेला भेट देणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना त्यांनी पंतप्रधान मोदींची आणि सरकारच्या धोरणांची तोंडभरुन स्तुती केली. अलीकडेच त्यांनी पंतप्रधान मोदींना भारताची प्रमुख संपत्ती, असेही म्हटले होते.

त्यामुळेच थरुर यांच्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी टीका केल्या. सुरुवातीला थरुर यांनी या टीकांकडे दुर्लक्ष केले, मात्र आता पक्षाध्यक्ष खरगेंनी टीका केल्यामुळे थरुर यांनी पलटवार केला आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर शशी थरुर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही सुरू आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला