'Folkinokinihilipilification', शशी थरूरांनी ट्विट केला नवीन शब्द, जाणून घ्या अर्थ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:43 PM2021-05-21T18:43:28+5:302021-05-21T19:05:55+5:30

Shashi Tharoor : शशी थरूर यांनी 'Folkinokinihilipilification'चा वापर केल्यानंतर अनेक ट्विटर युजर्संनी या शब्दाचा उच्चारण आणि अर्थ काय आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली.

Shashi Tharoor tweeted the new word 'Folkinokinihilipilification', know the meaning ... | 'Folkinokinihilipilification', शशी थरूरांनी ट्विट केला नवीन शब्द, जाणून घ्या अर्थ...

'Folkinokinihilipilification', शशी थरूरांनी ट्विट केला नवीन शब्द, जाणून घ्या अर्थ...

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस खासदार शशी थरूर हे अनेकदा चर्चेत असतात. केवळ देशातील विविध विषयांवर परखड भूमिका मांडण्यासाठी नाही. तर, ते इंग्रजी भाषेतून संवाद साधणे आणि इंग्रजी भाषेवर असलेल्या प्रभुत्वासाठीही ओळखले जातात.

नवी दिल्ली : इंग्रजीमधील अनेक अप्रचलित शब्दांद्वारे सोशल मीडियावर (Social Media वादविवाद निर्माण करणारे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शशी थरूर (Congress Leader Shashi Tharoor) यांनी शुक्रवारी ट्विटरवर 'Folkinokinihilipilification' या शब्दाचा वापर केला. या शब्दाचा उच्चार आणि अर्थ यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामा राव यांच्याशी मैत्रीपूर्ण चर्चेदरम्यान शशी थरूर यांनी हा शब्द वापरला. दरम्यान, के.टी. रामा राव म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांची नावे खूप अवघड आहेत, ज्यांचा उच्चार करणे सोपे नाही. यावर उत्तर म्हणून शशी थरूर म्हणाले, 'Folkinokinihilipilification'.

(काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार, नाना पटोलेंची घोषणा)

काही युजर्संनी 'Folkinokinihilipilification' या शब्दाची चर्चा फेसम गाणे 'कोलावेरी डी' सोबत जोडली आहे. युजर्संनी असे म्हटले आहे की, कोलावेरी डी समजण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली होती. त्याच प्रकारे, आपण हा नवीन शब्द समजून घेतला जाईल.

काय आहे या शब्दाचा अर्थ?
ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार, 'अर्थहीन गोष्टींबद्दल विचार करण्याची सवय' असा 'Folkinokinihilipilification' या शब्दाचा अर्थ आहे. शशी थरूर यांनी 'Folkinokinihilipilification'चा वापर केल्यानंतर अनेक ट्विटर युजर्संनी या शब्दाचा उच्चारण आणि अर्थ काय आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली.

(कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी 'बनारस मॉडेल', नरेंद्र मोदींवर नवाब मलिकांचा निशाणा)

शशी थरूरांचे इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व
काँग्रेस खासदार शशी थरूर हे अनेकदा चर्चेत असतात. केवळ देशातील विविध विषयांवर परखड भूमिका मांडण्यासाठी नाही. तर, ते इंग्रजी भाषेतून संवाद साधणे आणि इंग्रजी भाषेवर असलेल्या प्रभुत्वासाठीही ओळखले जातात. शशी थरूर वापरत असलेले अनेक इंग्रजी शब्द बहुतेकांना माहितीही नसतात. दरम्यान, शशी थरूर अनेक वादग्रस्त विधाने, परखड मते यांमुळे चर्चेत आलेले पाहायला मिळतात. मात्र, आता या वेगळ्याच प्रकरणामुळे थरूर पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसत आहे.
 

Web Title: Shashi Tharoor tweeted the new word 'Folkinokinihilipilification', know the meaning ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.