शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:38 IST

Shashi Tharoor: शशी थरुर परदेशात भारताची बाजू मांडत असताना काँग्रेस नेते त्यांच्यावरच टीका करत आहेत.

Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरुर भारताने जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळाचा एक भाग आहेत. ऑपरेशन सिंदूरचे यश आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी ते जगभरात भारताची बाजू मांडत आहेत. पण, यादरम्यान काही काँग्रेस नेते त्यांच्या अनेक विधानांवर नाराज असून, त्यांच्यावर सातत्याने टीकाही करत आहेत. अशातच, थरूर यांनी या सर्व टीकांवर स्पष्टपणे भाष्य केले.

टीकेवर शशी थरूर यांचे उत्तरकाँग्रेस नेत्यांनी केलेल्या अनेक टीकांबाबत थरुर यांना विचारले असता ते म्हणाले, 'मला वाटते की, आपण आपले ध्येय गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. एका समृद्ध लोकशाहीत टीका होणे साहजिक आहे. पण, मी यावेळी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. मी भारतात परत येईल, तेव्हा सहकाऱ्यांशी, टीकाकारांशी, माध्यमांशी बोलेन, त्यांना योग्य ते उत्तर देईन. सध्या आम्ही ज्या देशांमध्ये जात आहोत, त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि येथील लोकांपर्यंत भारताचा संदेश पोहोचवणे गरजेचे आहे,' असे थरुर म्हणाले.

काँग्रेस नेत्यांची टीकाकाँग्रेस नेते उदित राज यांनी शशी थरुर यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, काँग्रेसने त्यांना सर्व काही दिले, परंतु त्यांनी काँग्रेसविरुद्ध विधाने देऊन हे स्पष्ट केले की, त्यांना काँग्रेसचे कल्याण नको आहे. दुसरीकडे, पवन खेरा म्हणाले की, थरूर यांनी त्यांच्या पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकवर टीका केली होती, परंतु आता ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्याचे कौतुक करत आहेत. पंतप्रधान मोदींनी थरूर यांना त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते किंवा परराष्ट्र मंत्री बनवावे, कारण थरूर फक्त भाजपसाठी काम करत आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.

भाजपने केले कौतुक  एकीकडे काँग्रेस शशी थरुर यांना लक्ष्य करत आहे, तर दुसरीकडे भाजप त्यांच्या कामाचे कौतुक करत आहे. भाजप म्हणते की, विरोधी पक्ष असूनही शशी थरुर यांना इतकी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ते ही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. परंतु काही काँग्रेस नेते त्यांच्या कामावर टीका करत आहेत. यावरून काँग्रेसमधील निराशा आता हळूहळू बाहेर येत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपा