नवा वाद : पाकमधील ऑनलाईन कार्यक्रमात थरूर यांची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 03:59 AM2020-10-19T03:59:30+5:302020-10-19T07:20:14+5:30

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे अकल्पनिय आहे की, काँग्रेसचे नेते थरुर हे पाकिस्तानच्या व्यासपीठावर भारताविरुद्ध याप्रकारचे वक्तव्ये करत आहेत. त्यांनी भारताची प्रतिष्ठा कमी केली असून देशाची चुकीची प्रतिमा तयार केली आहे.

shashi Tharoor criticizes Modi government in an online program in Pakistan | नवा वाद : पाकमधील ऑनलाईन कार्यक्रमात थरूर यांची मोदी सरकारवर टीका

नवा वाद : पाकमधील ऑनलाईन कार्यक्रमात थरूर यांची मोदी सरकारवर टीका

googlenewsNext

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी लाहोरमधील एका कार्यक्रमात केलेल्या ऑनलाइन भाषणात मोदी सरकारवर टीका केल्यानंतर काँगे्रस आणि भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यामुळे भारताची बदनामी झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपने सवाल केला आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पाकिस्तानात निवडणूक लढवू इच्छितात काय? भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे अकल्पनिय आहे की, काँग्रेसचे नेते थरुर हे पाकिस्तानच्या व्यासपीठावर भारताविरुद्ध याप्रकारचे वक्तव्ये करत आहेत. त्यांनी भारताची प्रतिष्ठा कमी केली असून देशाची चुकीची प्रतिमा तयार केली आहे. पात्रा असेही म्हणाले की, केरळमधून संसद सदस्य असलेले थरूर हे राहुल गांधी यांचे निकटचे मित्र आहेत आणि राहुल गांधी हे चीन आणि पाकिस्तानात पूर्वीपासूनच नायक आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, भाजपने वस्तुस्थितीचा मुकाबला नेहमीच खोट्या पद्धतीने केला आहे. त्यांचे वक्तव्ये ऐकून तुमचे लक्ष केंद्रीत होऊ शकते. पण, आपल्याला समजेल की, भाजप केवळ असे विधाने करून लक्ष केंद्रीत करीत आहे.
काय म्हणाले होते थरूर?

- हा कार्यक्रम मागील महिन्यात झाल्याचे थरुर यांच्या कार्यालयाचे म्हणणे आहे. ‘लाहोर थिंक फेस्ट’मध्ये आॅनलाइन कार्यक्रमात बोलताना थरुर यांनी मोदी सरकारवर कोरोनावरुन टीका केली होती. या काळात मुस्लिमांविरुद्ध कथित कट्टरता व पूर्वग्रह याबाबतही वक्तव्ये केली होती.

- थरुर यांनी देशाच्या पूर्वोत्तर राज्यांच्या भारतीयांच्या समस्येचाही उल्लेख केला होता.

Web Title: shashi Tharoor criticizes Modi government in an online program in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.