शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:44 IST2025-06-05T15:43:06+5:302025-06-05T15:44:08+5:30

Sharmishtha Panoli News: प्रक्षोभक विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोली हिला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती राजा बसू यांनी शर्मिष्ठा हिला जामीन दिला आहे.

Sharmishtha Panoli granted bail, Calcutta High Court imposed these conditions while granting bail | शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी

शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी

प्रक्षोभक विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोली हिला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती राजा बसू यांनी शर्मिष्ठा हिला जामीन दिला आहे.

दरम्यान, जामीन देताना कोलकाता उच्च न्यायालयाने शर्मिष्ठा हिला काही अटी घातल्या आहेत. कोर्टाने शर्मिष्ठा हिच्यावर देश सोडण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. कोर्टाने सांगितले की, शर्मिष्ठा ही मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. तसेच तिला जामीन म्हणून १० हजार रुपये जमा करावे लागतील.

त्याबरोबरचशर्मिष्ठा हिच्याकडून अटकेपूर्वी तिच्या सुरक्षेबाबत नोंदवण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे आदेश कोलकाता हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. मी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर मला धमक्या मिळत आहेत, असा दावा शर्मिष्ठा हिने केला आहे.

खंडपीठाने सांगितले की, आम्हाला अभिव्यक्तीचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र याचा अर्थ कुणाच्याही धार्मिक भावना दुखवाव्यात असा होत नाही. जर शिक्षा सात वर्षांपेक्षा कमी असली तरी पोलिसांना कुणालाही अटक करण्याचा अधिकार आहे, असेही कोर्टाने स्पष्ट केले.  

Web Title: Sharmishtha Panoli granted bail, Calcutta High Court imposed these conditions while granting bail