शरद पवार हिंदुजा रुग्णालयात, दिलीप कुमार यांच्या तब्येतीची केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 03:43 PM2021-06-06T15:43:23+5:302021-06-06T15:47:07+5:30

दिलीप कुमार यांच्यावर गेल्य काही दिवसांपासून घरीच उपचार सुरु होते. मात्र, आज रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना तातडीने हिंदुजा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले

Sharad Pawar visited Dilip Kumar at Hinduja Hospital today discuss with sayra bano | शरद पवार हिंदुजा रुग्णालयात, दिलीप कुमार यांच्या तब्येतीची केली विचारपूस

शरद पवार हिंदुजा रुग्णालयात, दिलीप कुमार यांच्या तब्येतीची केली विचारपूस

googlenewsNext
ठळक मुद्दे शरद पवार यांना दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच, त्यांनी खार येथील हिंदुजा रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यासंदर्भात माहिती मिळताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांची भेट घेतली. तसेच, त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चाही केली आहे. शरद पवार यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. 

दिलीप कुमार यांच्यावर गेल्य काही दिवसांपासून घरीच उपचार सुरु होते. मात्र, आज रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना तातडीने हिंदुजा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. (Dilip Kumar admitted to hinduja hospital) तूर्तास डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांच्या हवाल्याने एएनआयने याबाबतचे वृत्त दिले.

शरद पवार यांना दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच, त्यांनी खार येथील हिंदुजा रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच, अभिनेत्री सायरा बानू यांच्याशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली. दिलीप कुमार हे लवकर ठणठणीत बरे होवोत, अशी प्रार्थना करत असल्याचंही शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच केले होते दाखल 

गेल्या महिन्यातही दिलीप कुमार यांना याच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्थात रूटिन चेकअपसाठी दिलीप कुमार यांना भरती करण्यात आल्याचे सायरा बानो यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. लवकरच त्यांना डिस्चार्जही झाला होता. कोरोना संक्रमणामुळे गेल्या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले. गतवर्षी 21 ऑगस्टला त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले होते. ते 88 वर्षांचे होते. यानंतर 2 सप्टेंबरला आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता. ते 90 वर्षांचे होते.

दिलीप कुमार-सायरा बानो हे आदर्श कपल

दिलीप कुमार व सायरा बानो बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून ओळखले जाते. सायरा बानो सावलीसारख्या दिलीप कुमार यांच्यासोबत आहेत. त्यांची सेवा करत आहे. ‘मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है,’ असे सायरा बानो यावेळी यापूर्वी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.  

Web Title: Sharad Pawar visited Dilip Kumar at Hinduja Hospital today discuss with sayra bano

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.