राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार; कार्यकारणी बैठकीत एकमताने निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 06:35 IST2022-09-11T06:34:53+5:302022-09-11T06:35:10+5:30

शरद पवार यांची निवड एकमताने झाल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

Sharad Pawar again as President of NCP; Consensus selection at executive meeting | राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार; कार्यकारणी बैठकीत एकमताने निवड

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार; कार्यकारणी बैठकीत एकमताने निवड

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची पुन्हा एकमताने निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला.

शरद पवार यांची निवड एकमताने झाल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. देशापुढे असलेल्या विविध समस्यांवर सदस्यांनी या बैठकीत प्रस्ताव मांडले. त्यावरही सविस्तर चर्चा झाली. महागाई, ओबीसी आरक्षण, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जाणीवपूर्वक तपास यंत्रणाद्वारे केली दडपशाहीच्या विरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.

विरोधकांच्या एकजुटीत पवारांची भूमिका
येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न विविध पातळीवरून होत आहे. यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. आतापर्यंत या संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी विरोधकांचे एकत्र येणे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे खासदारांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar again as President of NCP; Consensus selection at executive meeting