शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हरियाणात सेक्स रॅकेट उधळलं, महिलांसह 5 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 4:46 PM

हरियाणातल्या पलवलमधल्या प्रकाश विहार येथे सुरू असलेलं सेक्स रॅकेट पोलिसांनी उधळलं आहे. सेक्स रॅकेट चालवणा-या 3 महिला आणि दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली.

पलवल- हरियाणातल्या पलवलमधल्या प्रकाश विहार येथे सुरू असलेलं सेक्स रॅकेट पोलिसांनी उधळलं आहे. सेक्स रॅकेट चालवणा-या 3 महिला आणि दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. पलवल पोलीस स्टेशनच्या ठाणेदार कमला देवी यांनी सांगितलं की, प्रकाश विहारमधल्या एका व्यक्तीनं सेक्स रॅकेट सुरू असल्याची पोलिसांना सूचना दिली. त्या व्यक्तीच्या बाजूलाच राहणाऱ्या रणबीर नावाच्या दुस-या व्यक्तीच्या दुकानामध्येच हे सेक्स रॅकेट सुरू होतं.सूचना मिळताच पोलिसांनी छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांना रणबीरच्या दुकानात 3 महिला आणि दोन तरुण अश्लील अवस्थेत दिसले, त्यावेळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे त्यातील दोन महिला विवाहित आहेत, तर एक अविवाहित आहे. अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची ओळखही पटली असून, नरेश आणि राकेश यांना अटक करण्यात आली आहे. या पाच आरोपींविरुद्ध देहव्यापार करण्यात खटला दाखल करण्यात आला आहे. तर छाप्यादरम्यान दुकानाचा मालक पोलिसांना चकमा देऊन फरार झाला आहे. 

तर गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये एक ढोंगीबाबा आश्रमातच सेक्स रॅकेट चालवत असताना पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला होता. मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यात पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले असून, या रॅकेटचा म्होरक्या एक पुजारी असल्याचे समोर आले होते. तंत्रामंत्राच्या आडून बाहेरून मुली आणि महिलांना आणून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान या रॅकेटचा म्होरक्या असलेला पुजारी फरार झाला होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राघवी पोलीस ठाणे क्षेत्रातील बालेरा गावात एक ढोंगीबाबा आपल्या आश्रमामध्ये अनैतिक कृत्ये करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राघवी ठाण्याचे टीआय दिनेश भोजक आपल्या पथकासह या या आश्रमाच्या ठिकाणी गेले. तेथे एक कॉलगर्ल दोन व्यक्तींसह आक्षेपार्ह स्थितीत सापडली. या तिघांनाही अटक करण्यात आली. मात्र गोंधळाचा फायदा घेऊन बोगस बाबा रामदास तिथून पसार झाला होता. हा बाबा आपल्याकडे तंत्रसिद्धी असल्याचा दावा करत असे. मात्र त्याच्या आडून तो असे काही धंदे चालवत असेल याची कल्पना गाववासियांना नव्हती. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळ