शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

37वी भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहीम, 21 भारतीय संशोधकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 19:39 IST

अलिबाग- पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या अंटार्क्टिका खंडावरील ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला

- जयंत धुळपअलिबाग- पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या अंटार्क्टिका खंडावरील ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला असून, २१ भारतीय संशोधकांचा समावेश असणा-या या मोहिमेचे उपनेते आणि अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो हे या मोहिमेत यावेळी तिस-यांदा सहभागी झाले आहेत.भारती स्टेशन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. शैलेश पेडणेकर या मोहिमेदरम्यान बर्फाच्छादित अंटार्क्टिका खंडावरील मैत्री स्टेशन या भारतीय संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून भारतीय हवामान विभागाचे संशोधक सुन्नी चूग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच खंडावरील भारत सरकारच्या भारती स्टेशन या संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ँड ओशन रिसर्च संस्थेचे संशोधक डॉ. शैलेश पेडणोकर यांची तर उप प्रमुख म्हणून अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या सागरी जलप्रवासाचे (व्हॉयेज) प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ँड ओशन रिसर्च संस्थेचे डॉ. योगेश राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अणू, वनस्पती, प्राणी आणि इलेक्टॉनिक्स संशोधकांचा समावेश३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या उर्वरित १७ संशोधकांच्या चमू मध्ये डॉ.नरेंद्र सिंग रावत (भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर), डॉ.सुकूमार भक्ता (बॉटेनिकल सव्र्हे ऑफ इंडिया), अमित रावूतेला (डिफेन्स ईलेक्ट्रॉनिक्स अप्लिकेशन लॅबोरेटर), इलेक्टॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एम.श्रीधर, अब्दूल हाय नोमान, इंश्वर राव, जी.नागाराजू, जी.लक्ष्मी नारायण रेड्डी, एस.राजू बाबू, राजेश कुमार तित्ला, सोमा राजू सोंगा, एस.सुधाकर, जिऑलॉजीकल सव्र्हे ऑफ इंडियाचे प्रदिप कुमार, मोहमद सादिक, दिपक युवराज गजभिये, झाहीद हाबीब आणि नॅशनल इंन्स्टीटय़ूट ऑफ हाय सिक्यूरीटी अनिमल डिसिजेसच्या संशोधक डॉ.अश्विन अशोक राउत यांचा समावेश आहे.अंटार्क्टिका खंडाचा शोधअंटार्क्टिका खंडाचा शोध जेम्स कुक यांनी सन १७७२ मध्ये लावला. त्यानंतर लगेचच म्हणजे ७ जानेवारी १८२० या दिवशी प्रथमच बेलिग्ज हाऊजेन या दर्यावद्र्याने सुमारे ५० किलोमीटर अंतरावरून बर्फाच्या डोंगरांची रांग पाहिली आणि त्याची विस्तृत माहिती जहाजाच्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवली. आणि म्हणून या दिवशी या खंडाचा शोध लागला असे मानले जाते. दक्षिण ध्रुवाभोवतीचे खंड क्षेत्नफळ १,३३,७७,००० चौ. किमी. आहे. हा खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड देशांपासून दूर व स्वतंत्र आहे. अंटार्कक्टिका सभोवतीच्या महासागराला अंटार्क्टिका  महासागर किंवा दक्षिण महासागर म्हटले जाते. बेटांवर बर्फाची जाडी ४२७० मी. आहे. खंडावरील बर्फाचा थर सरासरीने सुमारे १.६ किमी. जाडीचा आहे. जगातील शुद्ध पाण्याच्या एकूण साठय़ा पैकी फार मोठा भाग या खंडावर हिम व बर्फरूपाने साठलेला असल्याचे निष्कर्श या पूर्वी झालेल्या वैज्ञानिक संशोधन मोहिमांचे आहेत.अंटार्क्टिकावर पोहोचणार भारत १३ वा देश, १९८२ पासून भारतिय मोहिमांना प्रारंभ९ जानेवारी १९८२ रोजी भारताच्या पहिल्या वैज्ञानिक मोहिमेतील सदस्यांनी अंटार्क्टिकावर प्रथमच भारताचा तिरंगा फेंडा फडकवला. सन १९८३ मध्ये कर्नल सत्यस्वरूप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण गंगोत्री हे कायमस्वरूपी स्थानक बांधले. तेव्हापासून या स्थानकावर वर्षभर राहण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येथे केलेले संशोधन सायंटिफिक कमिटी फॉर अंटार्क्टिका रिसर्च (एस.सी.ए.आर.) या संस्थेला प्रथम पाठवले जाते आणि तेथून ते विश्वातील सर्व राष्ट्रांना जाते. भारत हा अंटार्क्टिका येथे पोहोचलेला जगातील १३ वा देश आहे. त्यामुळे भारताला अंटार्कक्टिका संबंधित सल्लामसलतीचा हक्क प्राप्त झाला आहे. दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र कालांतराने बंद करण्यात आलेले असून, सन १९८९ मध्ये मैत्री हे कायमस्वरुपी भारतीय संशोधन केंद्र येथे बांधण्यात आले. त्यानंतर भारती या दुस-या भारतीय संशोधन केंद्राची निर्मिती येथे करण्यात आली आहे.भारतीस प्रगत संशोधन प्राप्त होणारअंटार्क्टिका खंडावरील भारतीय वैज्ञानिक मोहिमांचे आयोजन गोवास्थित नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ँड ओशन रिसर्च या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते. नुकत्याच सुरू झालेल्या ३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेत भूचुंबकीयशास्त्र, अणू व अणुशक्ती, वनस्पतीशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, प्राणी व प्राणिजन्य व्याधी विषयक या खंडावर प्रगत संशोधन करण्यात येणार आहे.