शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

7 soldiers killed in Ladakh Accident: लडाखमध्ये भीषण अपघात, ७ जवानांना गमवावे लागले प्राण; हवाई दलाकडून मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:03 IST

Seven soldiers die, several hurt in accident in Ladakh's Turtuk sector : गंभीर जखमींना भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून वेस्टर्न कमांडमध्ये हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : लडाखच्या तरतुक सेक्टरमध्ये झालेल्या वाहन अपघातात भारतीय लष्कराच्या ७ जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.  Seven soldiers die, several hurt in accident in Ladakh's Turtuk sector. एएनआय या वृत्तसंस्थेने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. जखमींवर योग्य उपचार आणि काळजी घेण्याचे प्रयत्न सुरू असून, याअंतर्गत गंभीर जखमींना भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून वेस्टर्न कमांडमध्ये हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, रस्ता अपघातातील जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गंभीर जखमींना वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे. यामध्ये हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे. थोइसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा रस्ते अपघात झाला. शुक्रवारी 26 जवानांचे पथक परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उप-सेक्टर हनिफच्या पुढच्या ठिकाणाकडे जात होते. सकाळी नऊच्या सुमारास वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. रस्त्यापासून नदीची खोली सुमारे 50-60 फूट आहे. त्यामुळे वाहनातील सर्व जवान गंभीर जखमी झाले. यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. या सर्व 26 जवानांना परतापूर येथील 403 फिल्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. लेहमधील सर्जिकल टीम्स परतापूरला पाठवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AccidentअपघातladakhलडाखSoldierसैनिकDeathमृत्यू