ट्रॅक्टर नदीत पडून भीषण अपघात; सात महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 15:55 IST2020-02-08T15:54:35+5:302020-02-08T15:55:10+5:30
महिला ऊसतोड कामगारांना घेऊन जात असलेला ट्रॅक्टर पुलावरून नदीपात्रात पडून झालेल्या भीषण अपघातात सात महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे.

ट्रॅक्टर नदीत पडून भीषण अपघात; सात महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू
बेळगाव - महिला ऊसतोड कामगारांना घेऊन जात असलेला ट्रॅक्टर पुलावरून नदीपात्रात पडून झालेल्या भीषण अपघातात सात महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधील बोगूर पुलावर घडला.
आज सकाळी 15 महिला उसतोड कामगारांना घेऊन हा ट्रॅक्टर बोगूर गावामधून इटगीच्या दिशेने निघाला होता. मात्र वाटेत हा ट्रॅक्टर बोगूर पूल येथे आला असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर आणि ट्रॉली नदीपात्रात पडले.
या भीषण अपघातात सात महिला उसतोड कामगारांचा मृत्यू झाला. तर काही महिला ऊसतोड कामगार जखमी झाल्या. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.