Azam Khan Hate Speech: आझम खान यांना मोठा दणका! तुरूंगावासाच्या शिक्षेसोबतच आमदारकीही रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 09:04 PM2022-10-28T21:04:08+5:302022-10-28T21:07:21+5:30

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरूद्ध केली होती द्वेषपूर्ण विधाने

Setback for Azam Khan in Hate Speech Case as his Uttar Pradesh UP assembly membership canceled by elections in Rampur with imprisonment | Azam Khan Hate Speech: आझम खान यांना मोठा दणका! तुरूंगावासाच्या शिक्षेसोबतच आमदारकीही रद्द

Azam Khan Hate Speech: आझम खान यांना मोठा दणका! तुरूंगावासाच्या शिक्षेसोबतच आमदारकीही रद्द

Next

Azam Khan Hate Speech: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यूपी विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले. त्यामुळे आता त्यांच्या विधानसभा मतदारसंघ रामपूरमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. नुकतेच त्यांना द्वेषपूर्ण व चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. यासोबतच त्यांना सहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

द्वेषपूर्ण व चिथावणीखोर विधाने केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर आणि शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विधानसभा सदस्यत्वावर संकट आल्याचे मानले जात होते. त्यांना न्यायालयाने शिक्षेसह जामीन दिला असला तरी त्यांना विधानसभेत मोठा धक्का बसला. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले. सभापती कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार आझम खान यांना कलम १५३ए, आयपीसी कलम ५०५(१) आणि लोकप्रतिनिधी कलम १२५ अंतर्गत प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांना आणखी एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा असणार आहे.

शिक्षा सुनावल्यानंतर आझम खान यांची पहिली प्रतिक्रिया दिली. सत्र न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर आझम खान म्हणाले की, मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. पण या निर्णयाविरुद्ध मी वरच्या कोर्टात नक्कीच अपील करणार आहे. मी याबाबत वकिलांशी चर्चा करणार असून योग्य ती याचिका दाखल करणार आहे.

विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आझम खान हे रामपूर लोकसभा मतदारसंघातून सपा-बसपा युतीचे उमेदवार होते. एप्रिल २०१९ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी मिलक कोतवाली भागातील खतनगरिया गावात जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी अंजनेय कुमार सिंह यांच्याबद्दल प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप आहे. आझम खान यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी व्हिडिओ निरीक्षण पथकाचे प्रभारी अनिलकुमार चौहान यांच्यावतीने मिलक कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Setback for Azam Khan in Hate Speech Case as his Uttar Pradesh UP assembly membership canceled by elections in Rampur with imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.