शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 08:40 IST

Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024 Result) मुद्दा अमेरिकेत उपस्थित केला. येथील ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी देशाच्या निवडणूक प्रक्रियेत गंभीर समस्या अससल्याचा आरोपही केला.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने दणदणीत विजय मिळवला होता. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला होता. तेव्हापासून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून महाराष्ट्रातील निवडणुकीवर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा अमेरिकेत उपस्थित केला. येथील ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी देशाच्या निवडणूक प्रक्रियेत गंभीर समस्या अससल्याचा आरोपही केला.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले की, स्पष्टच शब्दात सांगायचं तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत तरुणांच्या संख्येपेक्षा अधिक मतदान झालं. हे एक वास्तव आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी दिली. संध्याकाळी ५.३० ते ७ या मतदान संपवण्याच्या काळात तब्बल ६५ लाख मतदारांनी मतदान केलं. प्रत्यक्षात असं घडणं कठीण आहे. त्याचं कारण म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी किमान ३ मिनिटं लागतात. मोजणी केली तर संपूर्ण मतदान होण्यासाठी रात्रीचे २ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसल्या असत्या. तसेच रात्रभर मतदान चाललं असतं. मात्र प्रत्यक्षात असं काही घडलं नाही.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, या कारणामुळेच आम्ही त्यांना मतदानाचं चित्रिकरण झालं आहे का असं विचारलं, मात्र त्यांनी चित्रिकरण देण्यास नकार दिला. एवढंच नाही तर त्यांनी कायदाच बदलला. त्यामुळे आता चित्रिकरण मागता येणार नाही. यावरून निवडणूक आयोगाने काही तडजोडी केल्या आहेत, हे स्पष्ट झालं आहे. तसेच या व्यवस्थेमध्ये खूप गडबड झाली आहे, हेही स्पष्ट होत आहे. आम्ही याबाबत अनेकदा सार्वजनिकरीत्या आवाज उठवला आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUnited Statesअमेरिकाmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024