शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

सनसनाटी आरोपांपासून निकालांपर्यंत! जाणून घ्या 2जी घोटाळ्याविषयी सर्व काही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 4:02 PM

 देशातील राजकारणात भूकंप घडवणाऱ्या 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी आज पतियाळा हाऊस कोर्टातील विशेष सीबीआय न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे.

नवी दिल्ली -  देशातील राजकारणात भूकंप घडवणाऱ्या 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी आज पतियाळा हाऊस कोर्टातील विशेष सीबीआय न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा, डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांच्यासह सर्व आरोपींना मुक्त केले आहे. केंद्रातील राजकारण हलवणाऱ्या आणि काँग्रेसच्या पराभवातील एक महत्त्वाचे कारण ठरलेल्या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सनसनाटी आरोपांपासून निकालांपर्यंत महत्त्वाच्या दहा गोष्टी.1) नोव्हेंबर 2010 साली कॅगचा अहवाल समोर आल्यानंतर 2जी घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यामुळे सरकारचे 1 लाख 76 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच आरोपांना प्रत्युत्तर देणे तत्कालीन मनमोहन सिंग सरकारसाठी कठीण झाले होते.2) या प्रकरणी  विशेष न्यायाधीश सैनी यांच्या समक्ष तीन खटले आले होते. त्यापैकी दोन सीबीआयकडून दाखल करण्यात आले होते. सीबीआयच्या पहिल्या खटल्यात राजा आणि कनिमोझी यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. राजा यांनी प्रथम निविदा दाखल करण्याची डेडलाइन 1 ऑक्टोबर 2007 निश्चित केली. त्यानंतर निविदा प्राप्त करण्याची कट ऑफ डेट बदलल्याने 575 मधील 408 इच्छुक शर्यतीमधून बाहेर पडले.  3)  प्रथम या प्रथम लाभ घ्या या धोरणाचे उल्लंघन करण्यात आले, असा या प्रकरणात दुसरा आरोप झाला. तसेच या क्षेत्रातील कोणताही अऩुभव नसलेल्या लाभार्थी कंपन्यांच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसेच नव्या ऑपरेटर्ससाठी एंट्री फीबाबत संशोधन झाले नाही. 4) 4 - या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ए. राजा यांनी आपण जे काही निर्णय घेतले त्यांची माहिती तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना होती. असे न्यायालयात वारंवार सांगितले. तसेच ट्रायने अनुभवाची अट रद्द केली होती. असा दावा केला होता. जी कंपनी 1650 रुपये भरेल ती स्पेक्ट्रमच्या लिलावात भाग घेण्यासाठी पात्र ठरेल, असे प्राधिकरणाने सांगितल्याचा दावा राजा यांनी केला होता.  6 - राजा यांनी केलेले सर्व आरोप सीबीआयने फेटाळून लावत राजा यांनी नवख्या कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटल्याचा आरोप केला होता. तसेच ईडीने या प्रकरणात एप्रिल 2014 मध्ये 19 लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये ए. राजा, कनिमोझी, शाहिद बलवा, विनोद गोयंका, आसिफ बलवा, राजीव अग्रवाल, करिम मोराणी आणि शरद कुमार यांचा समावेश होता.  7) राजा यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाले असते तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असती. दरम्यान कलैग्नार टीव्ही आणी डीबी रियाल्टी यांच्याती 200 कोटींचे व्यवहार झाल्याचे ईडीने म्हटले होते. हा पैसा डायनामिक्स रियाल्टीपासून निघून कुसेगाव फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आणि सिनेयुग फिल्म्स प्रा.लि.मध्ये फिरून कलैग्नार टीव्हीपर्यंत पोहोचला होता. 8) कॅगच्या अहवालात 2जी घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे 1 लाख 76 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर सीबीआयद्वारे दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये 30 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते.  9) तामिळनाडूमधील प्रमुख पक्ष असलेल्या डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या पत्नीचीसुद्धा या प्रकरणात चौकशी झाली होती. तसेच सीनेयुगच्या कार्यालयामधून शेअर कराराच्या मूळ प्रती हस्तगत करण्यात आल्या होत्या. 10) या प्रकरणातील पहिल्या खटल्यामध्ये ए. राजा आणि कनिमोझी यांच्याबरोबरच माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा, राजा यांचे तत्कालिन सचिव आर.के. चंदोलिया. स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहिद उस्मान बलवा आणि विनोद गोयंका, युनिटेक लिमिटेडचे व्यवस्थापकिय संचालक संजय चंद्रा, रिलायन्स धीरुभाई अंबानी (आरएडीएजी) चे तीन वरिष्ठ अधिकारी गौतम दोषी, सुरेंद्र पिपारा आणि हरी नायर यांना आरोपी बनवण्यात आले होते.  

टॅग्स :2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळाIndiaभारतCBIगुन्हा अन्वेषण विभागcongressकाँग्रेस