शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
2
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
3
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
4
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
5
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
6
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
7
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
8
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
9
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
10
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
11
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
12
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
13
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
14
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
15
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
16
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
17
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
18
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
19
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
20
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?

'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:00 IST

'शुक्ला जी' यांच्या ऐवजी कुण्या दलित व्यक्तीलाही पाठवता आले असते, असे उदित राज यांनी म्हटले आहे.

अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये (ISS) जवळपास दोन आठवडे राहिल्यानंतर कॅप्टन शुभांशू शुक्ला पुन्हा पृथ्वीवर परतत आहेत. ते मंगळवारी पृथ्वीवर लँड करण्याची शक्यता आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी, अंतराळ मोहीमेसाठी शुभांशू शुक्ला यांच्या निवडीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. 'शुक्ला जी' यांच्या ऐवजी कुण्या दलित व्यक्तीलाही पाठवता आले असते, असे उदित राज यांनी म्हटले आहे.

उदित राज म्हणाले, "मी शुभेच्छा देतो की, त्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा आणि त्यांनी तेथे जे ज्ञान प्राप्त केले आहे, ते येथे येऊन वाटावे. आम्हाला त्याचा फायदा व्हावा. ही मानवतेसाठी लाभाची गोष्ट आहे. यापूर्वी, राकेश शर्मा यांना पाठवण्यात आले होते. तेव्हा एससी एसटी लोक एवढे शिकलेले नव्हते. मला वाटते, यावेळी संधी होती. एखाद्या मागास, एखाद्या दलित व्यक्तीला पाठवायला हवे होते. एखादी परीक्षा देऊन तर गेले नाही अथवा ना नासामध्ये एखाद्या परीक्षेनंतर त्यांची निवड झाली. एखाद्या दलित व्यक्तीलाही शुक्ला जींच्या ऐवजी पाठवले जाऊ शकते."

केव्हापर्यंत परतणार शुभांशू शुक्ला? -अ‍ॅक्सिओम-04 मोहिमेअंतर्गत आयएसएसमध्ये गेलेले चार अंतराळवीर, शुभांशू शुक्ला (भारत), पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोज उजनांस्की-विस्निव्हस्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) हे सोमवारी स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयान आयएसएसवरून साधारणपणे दुपारी ४.३० वाजता पृथ्वीच्या दिशेने मिघाले आहेत. हे अंतराळयान आज १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्नियाजवळ उतरण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :NASAनासाisroइस्रोcongressकाँग्रेसSC STअनुसूचित जाती जमाती