भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 00:02 IST2024-06-26T23:59:49+5:302024-06-27T00:02:03+5:30

Lal Krishna Advani Admitted in AIIMS: एम्स रुग्णालयातील डॉक्टर लालकृष्ण अडवाणी यांच्यावर उपचार करत आहेत.

senior bjp leader lal krishna advani admitted to aiims hospital | भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल

Lal Krishna Advani Admitted in AIIMS: भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. लालकृष्ण अडवाणी यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आताच्या घडीला लालकृष्ण अडवाणी यांच्यावर एम्स रुग्णालयातील डॉक्टर उपचार करत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९६ आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली लालकृष्ण अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती आणि तिसरा कार्यकाळ सुरू करण्यापूर्वी त्यांचे शुभाशिर्वाद घेतले होते. तत्पूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 
 

Web Title: senior bjp leader lal krishna advani admitted to aiims hospital