सीमा-सचिनचा घरखर्च कसा चालतो, नेमकं कोण देतं त्यांना पैसे?; वकिलांनी दिलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 17:12 IST2023-09-13T17:10:43+5:302023-09-13T17:12:24+5:30
Seema Haider : सीमा आणि सचिनवर पोलीस केस झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून घरामध्येच आहेत. त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही.

सीमा-सचिनचा घरखर्च कसा चालतो, नेमकं कोण देतं त्यांना पैसे?; वकिलांनी दिलं 'हे' उत्तर
पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी भारतात पळून आलेली सीमा हैदर विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सीमा आणि सचिनवर पोलीस केस झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून घरामध्येच आहेत. त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही. अशातच त्यांचा घरखर्च नेमका कसा चालतो, त्यांना कोण मदत करतं, पैसे देतं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सीमाचे वकील एपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा आणि सचिनची परिस्थिती आता देखील हलाखीची आहे. त्यांना जे काही गिफ्ट्स मिळालेत त्याच पैशातून ते सध्या घरखर्च चालवत आहेत. तसेच सचिनचे वडील नेत्रपाल यांनी देखील घर चालवण्यासाठी आता कामावर जाण्यास सुरुवात केली आहे. नेत्रपाल रोपं विकण्याचं काम करतात. तिथूनच त्यांना पैसे देखील मिळतात.
एपी सिंह यांनी सांगितलं की, सीमा आणि सचिनने पैसे मिळवण्यासाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केलं आहे आणि युट्यूबवरही चॅनल सुरू करण्यात आलं आहे. पण दोन्ही प्लॅटफॉर्मवरून अद्याप त्यांना पैसे येण्यास सुरुवात झालेली नाही. लवकरच तिथून पैसे येतील अशी त्यांना आशा आहे. सीमा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिचे जवळपास 90 हजार फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच नवनवीन रिल्स शेअर करत असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.