शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

"लोक असे कपडे घालतात की पाहून.…’’, रिल्स बनवणाऱ्यांवर इंडिया आघाडीचे बडे नेते संतापले, संसदेत उपस्थित केला प्रश्न          

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:01 IST

Ram Gopal Yadav News:

मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर रिल्स बनवणाऱ्यांचा मोठ्या प्रमामावर सुळसुळाट झाला आहे. या रिल्स बनवण्याच्या नादात अनेक दुर्घटना झाल्याच्या बातम्याही येत असतात. तसेच बहुतांश रिल्समध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील अंगविक्षेप केले जातात. दरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक रामगोपाल यादव यांनी आज राज्यसभेमध्ये इन्स्टाग्राम रिल्सचा मुद्दा उपस्थित केला.

रिल्स बनवून ते सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर संतप्त झालेले रामगोपाल यादव  म्हणाले की, हे लोक असे कपडे परिधान करतात की जे पाहून मान शरमेनं खाली जाते. कुठल्याही समाजामध्ये न्यूडिटी आणि अल्कोहलिझम वाढला की अनेक संस्कृती नष्ट होतात. सरकारने हे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत, अशी मागणी रामगोपाल यादव यांनी केली. तसेच त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला जनसंघाच्या काळातील सभ्यता आणि संस्कृतीच्या संरक्षणाच्या घोषणेचीही आठवण करून दिली. 

रामगोपाल यादव म्हणाले की, आमच्या काळामध्ये इंग्रजी सहावीच्या वर्गापासून शिकवली जात असे. मुलं थोडी भाषा शिकले की, त्यांना सांगितलं जायचं की, कॅरॅक्टर इज लॉस, एव्हरीथिंग लॉस. आज परिस्थिती अशी आहे की, काही प्लॅटफॉर्म अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत. मी इथे इन्स्टाग्रामचा विशेष उल्लेख करेन. एका अंदाजानुसार आमच्या देशातील तरुण दररोज सरासरी तीन तास इन्स्टाग्रामवर रिल्स आणि टुकार मालिका पाहण्यामध्ये वेळ घालवत आहेत.  

एकत्र बसल्याने, सोबत जेवल्याने कुटुंबामध्ये जे प्रेम निर्माण होतं, ते आज राहिलेलं नाही. लोक सोबत बसून राहतात, पण फोनमध्ये गुंतलेले असतात. दररोज बातम्या येतात की, इन्स्टाग्रामवर मैत्री झाली, लग्नानंतर तरुणाने तरुणीची हत्या केलीय, अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यावेळी प्रा. यादव यांनी ऑनलाइन क्लासचाही उल्लेख केला. तसेच सरकारने न्यूडिटी आणि अल्कोहोलिझमला प्रोत्साहन देणाऱ्या प्लॅटफॉर्मविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीRajya Sabhaराज्यसभाInstagramइन्स्टाग्रामFacebookफेसबुक