मेव्हणीचं सौंदर्य पाहून 'जिजू'चं मन फिरलं, रात्रीचा फायदा उचलत मोठं कांड केलं...! सासुरवाडीच्या लोकांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:26 IST2025-05-27T17:25:34+5:302025-05-27T17:26:19+5:30
दुसऱ्या दिवशी हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, सासऱ्यांना धक्काच बसला. यानंतर सासरा जावयाची तक्रार घेऊन त्याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले. यानंतर, सासरच्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

मेव्हणीचं सौंदर्य पाहून 'जिजू'चं मन फिरलं, रात्रीचा फायदा उचलत मोठं कांड केलं...! सासुरवाडीच्या लोकांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सासूरवाडीत आलेला जावई अल्पवयीन मेव्हणीच्याच प्रेमात पडला. महत्वाचे म्हणजे, तिलाही तो आवडत होता. मात्र, यासंदर्भात, संबंधित जावयाच्या पत्नीला आणि सासुरवाडीतील मंडळींनाही कसलीही भनक लागली नाही. हे दोघेही लपून-छपून भेटत होते. एक दिवस, मेव्हणीच्या सौंदर्यावर 'जिजू' अथवा संबंधित जावई भाळला आणि त्याने एका रात्रीचा फायदा घेत, असे कृत्य केले, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.
दुसऱ्या दिवशी हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, सासऱ्यांना धक्काच बसला. यानंतर सासरा जावयाची तक्रार घेऊन त्याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले. यानंतर, सासरच्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
माध्यमांतील वृत्तांनुसार, हे प्रकरण शाही पोलिस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हणण्यात आले आरे की, १० वर्षांपूर्वी त्याने त्याच्या मोठ्या मुलीचे लग्न रामपूर जिल्ह्यातील एका गावातील एका तरुणाशी लावले होते. २४ मे रोजी त्यांचा जावई घरी आला. तो सर्वांशी मोकळेपणाने बोलत होता, राहत होता. त्यावेळी त्याच्या हेतूंवर कुणालाही शंका नव्हती. रात्री जेवण झाल्यानंतर सर्व जण झोपण्यासाठी गेले. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत जावयाने त्याच्या १५ वर्षांच्या मेव्हणीला पळवून नेले. सकाळी सगळे उठले तेव्हा जावई घरातून बेपत्ता असल्याचे आढून आले. संबंधित मुलगीही घरात नव्हती. यानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट झाले.
पीडित सासऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते जेव्हा त्यांच्या जावयाच्या घरी, त्याच्याविरुद्ध तक्रार घेऊन पोहोचले तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर, त्यांच्या मोठ्या मुलीसह तिच्या इतर तीन मुलींनाही मारहाण करून घराबाहेर हाकलून देण्यात आले. पीडित सासऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी आणि त्याच्या मुलीचा शोध घेत आहेत. लवकरच दोघांचाही शोध घेऊन, त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाईल.