IAS टीना डाबी, प्रदीप गावंडे अडकले विवाहबंधनात; लग्नाच्या पहिल्या फोटोनं साऱ्याचं लक्ष वेधलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:19 IST2022-04-22T18:18:14+5:302022-04-22T18:19:45+5:30

२० एप्रिल रोजी दोघांचा विवाह सोहळा पार पडला.

see photos of ias tina dabi and pradeep gawande first wedding pics tina bridal look in white silk saree rajasthan jaipur | IAS टीना डाबी, प्रदीप गावंडे अडकले विवाहबंधनात; लग्नाच्या पहिल्या फोटोनं साऱ्याचं लक्ष वेधलं!

IAS टीना डाबी, प्रदीप गावंडे अडकले विवाहबंधनात; लग्नाच्या पहिल्या फोटोनं साऱ्याचं लक्ष वेधलं!

Tina Dabi and Pradeep Gawande First Wedding Photo: आयएएस टीना डाबी आणि आयएएस प्रदीप गवांडे यांचा विवाह नजीकच्याच १५-२० लोकांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. २० एप्रिल रोजी दोघं विवाहबंधनात अडकतील अशी माहिती समोर आली होती.

दरम्यान, टीना डाबी आणि प्रदीप गवांडे यांच्या लग्नाचा फोटो आता समोर आला आहे. यापूर्वी टीना डाबी यांनी प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. 'तू दिलेलं हास्य परिधान करतेय', अशा कॅप्शनसह त्यांनी प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. गेल्या काही दिवसांपासून टीना आणि प्रदीप त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत होते. स्वत: टीना डाबी यांनी फोटो शेअर करुन आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्न करत असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती.

टीना यांनी प्रदीपसोबतच्या प्रेमाबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांची भेट कोरोनाच्या काळात झाली आणि त्यानंतर दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यावेळी दोघेही राजस्थानच्या आरोग्य विभागात एकत्र काम करत होते. टीना आणि प्रदीप दोघेही राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

Web Title: see photos of ias tina dabi and pradeep gawande first wedding pics tina bridal look in white silk saree rajasthan jaipur

टॅग्स :marriageलग्न