Security forces in Anantnag kill two terrorists | अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा
अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनागमधल्या बिजबेहरामध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मध्यरात्री चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कराच्या 3 आरआर आणि एसओजीच्या संयुक्त टीमनं गुरुवारी सकाळी हाऊन बंदर मोहल्ला परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं.

या टीमला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा सुरक्षा दलाच्या जवानांची संयुक्त टीम सर्च ऑपरेशन राबवत होती, त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूनं गोळीबार सुरू होता. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आलं. दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित आहेत.


सुरक्षा दलाच्या जवानांचं ऑपरेशन ऑलआऊट जारी
तत्पूर्वी 20 एप्रिलला दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. सोपोरमधल्या वाटरगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. 13 एप्रिलला शोपियानमध्ये लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. 6 एप्रिलला शोपियानमधल्या इमाम साहिब भागातही दोन दहशतवाद्यांना मारलं होतं. 28 मार्चलाही सुरक्षा दलाच्या जवानांनी शोपियान आणि हंदवाडामध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

English summary :
Jammu Kashmir Latest Update: Security forces have destroyed two terrorists in Anantnag in Jammu and Kashmir. Fights in between security forces and militants was started in Bijbehara, Anantnagam at midnight.


Web Title: Security forces in Anantnag kill two terrorists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.