मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची दुसरी वर्षपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 09:57 AM2021-05-30T09:57:03+5:302021-05-30T09:57:20+5:30

उज्ज्वला ३.० : स्थलांतरितांना मोफत कनेक्शन

The second year of the second term of the Modi government | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची दुसरी वर्षपूर्ती

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची दुसरी वर्षपूर्ती

Next

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शनची भेट देऊ शकते. याचा लाभ स्थलांतरित कामगारांनाही मिळेल.

सूत्रांनी सांगितले की, सार्वजनिक कंपन्यांनी याची तयारी केली आहे. या योजनेनुसार आगामी दोन वर्षात एक कोटी गॅस कनेक्शन गरीब कुटुंबांना महिलांच्या नावे देण्यात येणार आहेत. चालू आर्थिक वर्षात बजेटमध्येही याची घोषणा करण्यात आलेली आहे. सरकार दोन वर्षे पूर्ण करत असताना कोरोनामुळे कोणताही उत्सवी कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संख्या वाढली पण, वापर कमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम उज्ज्वला योजना १ मे २०१६ रोजी सुरु केली होती. या अंतर्गत देशातील ८ कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. अर्थात, यातील अनेकांनी एकदा गॅस सिलिंडर रिकामा झाल्यानंतर पुन्हा भरुन घेतलाच नाही. २०१९ पर्यंत सिलिंडर भरुन घेणाऱ्यांची संख्या केवळ ३ टक्के होती. १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी सरकार १४०० रुपयांची सबसिडी 
देते.

Web Title: The second year of the second term of the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.