शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा 'मे'च्या मध्यावर 'उद्रेक' होणार; राष्ट्रीय समितीनं यापूर्वीच केंद्राला दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 9:23 AM

Coronavirus Updates : मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे.

ठळक मुद्देसुरूवातीला तज्ज्ञांनी १२-१५ मे या कालावधीत रुग्णसंख्या वाढण्याचा वर्तवला होता अंदाजकेंद्रानं दीर्घकालिन उपायांऐवजी अल्पकालिन उपायांवर लक्ष दिल्याचं तज्ज्ञांचं मत

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या तेजीनं वाढत आहे आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत त्याचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे. १५ मे ते २२ मे या कालावधीत कोरोनाचा पीक असेल असं केंद्र सरकारला सांगण्यात आलं होतं. परंतु यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीक असेल असं सांगण्यात आलं, अशी माहिती आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक आणि कोविड-१९ सुपरमॉडेल समितीचे प्रमुख डॉ.एम. विद्यासागर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. "१३ मार्चपर्यंत कोरोनाच्या प्रकरणांचा आलेख वर जात होता हे कोणीही पाहू शकेल. परंतु तेव्हा आमच्याकडे इतका डेटाही नव्हता की आम्ही कोणती भविष्यवाणी करू शकू," असं ते म्हणाले. २ एप्रिल रोजी अधिकृतरित्या १५ ते २२ मे दरम्यान दररोज १.२ लाख नवे रुग्ण दररोज सापडू शकतात असं सांगण्यात आलं होतं. परंतु भारतात यापेक्षा अधिक प्रमाणात रुग्णांची नोंद झाली. सध्या देशात दररोज ३.५ लाखांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. तर दुसरीकडे आयआयटी कानपूरच्या एका अभ्यासात दररोज वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ८ मे पर्यंत पीक वर जाऊ शकते, असं सांगण्यात आलं होतंय यामध्ये १४ ते १८ मे दरम्यान देशात अॅक्टिव्ह केसेस ३८ ते ४४ लाखांच्या दरम्यान असू शकतात असंही म्हटलं होतं. "केंद्र सरकारनं दीर्घकालिन किंवा मध्यम कालावधीच्या योजनांव्यतिरिक्त अल्पकालिन योजनांवर लक्ष केंद्रीत केलं. परंतु गेल्या काही घटनांवर लक्ष दिलं तर ही पावलं यशस्वी ठरली नसल्याचंच दिसून येतं," असं विद्यासागर म्हणाले.केंद्राला माहिती होती का?कोरोनाचा इतक्या मोठ्या प्रमाणात विस्फोट होईल याची केंद्राला माहिती होती का असा प्रश्न या अभ्यासात उपस्थित करण्यात आला होता. जर असं होतं तर त्यांनी दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावलं उचलली असंही विचारण्यात आलं. "सुरुवातीला १५ ते २२ मे बा कालावधी वर्तवण्यात आला होता. तसंच अशात काही उपाययोजना लागू केल्या गेल्या असत्या. परंतु यासाठी ३-४ महिन्यांचा कालावधी लागला असता. आमच्याकडे वेळ नव्हती. आम्हाला जे काही करायचं होतं ते ३-४ आठवड्यांत करायचं होतं," असं विद्यासागर म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकार