शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांना ऐनवेळी विमानांत आसनवर्ग बदलून देणार नाही

By admin | Updated: November 23, 2014 02:31 IST

विमानांत ऐनवेळी आसनवर्ग बदलून वरच्या दर्जातील आसन देण्याची खासदारांकडून केली जाणारी विनंती मान्य करणो यापुढे शक्य होणार नाही.

नवी दिल्ली : विमानांत ऐनवेळी आसनवर्ग बदलून वरच्या दर्जातील आसन देण्याची खासदारांकडून केली जाणारी विनंती मान्य करणो यापुढे शक्य होणार नाही. तसेच खासदारांना विमानात ठरलेल्या मर्यादेहून जादा सामानही (एक्स्ट्रा बॅगेज) नेता येणार नाही, असे एअर इंडियाने संसदीय सचिवालयास स्पष्टपणो कळविले आहे.
 खासदारांचे देशांतर्गत अधिकृत दौरे  एअर इंडियाच्या विमानाने होत असतात. विविध संसदीय समित्यांच्या देशाच्या विविध भागांतील भेटीसाठी खासदार जेव्हा जातात तेव्हा विमानात ‘एक्ङिाक्युटिव्ह क्लास’ची जास्तीत जास्त आसने उपलब्ध करून देण्याची विनंती  वारंवार केली जाते. मात्र ज्या मार्गावर फक्त ‘इकॉनॉमी क्लास’ची आसनव्यवस्था असलेली विमान चालविली जातात तेथे खासदारांना ‘एक्ङिाक्युटिव्ह क्लास’ची आसने कशी द्यायची, असे एअर इंडियाचे म्हणणो आहे.
एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांनी लोकसभेचे महासचिव पी. के. ग्रोव्हर यांना अलीकडेच पाठविलेल्या पत्रत म्हटले आहे की, संसदीय समित्यांच्या दो:यांच्या वेळी खासदारांना ‘एक्ङिाक्युटिव्हक्लास’ची आसने उपलब्ध व्हावीत यासाठी ऐनवेळी विमानच बदलण्याची विनंती आमच्याकडे अनेक वेळा केली जाते. तसेच खासदारांसाठी सोबत आणायच्या सामानाच्या वजनाची मर्यादा शिथिल केली जावी, अशीही मागणी केली जाते.
रोहित नंदन म्हणतात की, एअर इंडियाच्या ताफ्यात एअरबस 319, 32क् व 321 या जातीची विमाने आहेत व या विमानांमध्ये ‘बिझनेस क्लास’ची अनुक्रमे फक्त 8, 2 व 2क् आसने उपलब्ध असतात. प्रवाशांनी पूर्ण पैसे भरून आधीपासून आसनांचे आरक्षण केलेले असते. त्यामुळे संसदीय समित्यांच्या दौ:यांच्या वेळी समितीमधील सर्व खासदारांना दरवेळी वरच्या वगार्ची आसने उपलब्ध करून देणो शक्य होईलच असे नाही. अशावेळी अडचणीची परिस्थिती निर्माण होते व खासदारांना त्यांची विनंती मान्य करता येणार नाही, असे नाईलाजाने सांगावे लागते.
एअर इंडियाने संसदीय सचिवालयास असेही कळविले आहे की, जास्तीत जास्त महसूल मिळावा यासाठी देशांतर्गत मार्गावर वापरल्या जाणा:या अरुंद बांधणीच्या अनेक विमानांमधील आसनव्यवस्था बदलून विमानात फक्त ‘इकॉनॉमी क्लास’ची आसने ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे अशा मार्गावर प्रवास करताना खासदारांची वरच्या वर्गातील आसने देण्याची विनंती पूर्ण करणो शक्य होणार नाही. विमानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सामानाच्या वजनावरील मर्यादेचे नियम तयार केलेले आहेत.