शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

शाळांनी गणवेशासाठी खादीचा वापर करावा; उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 12:40 PM

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची सूचना : ‘खादी इंडिया क्विझ स्पर्धेचे उद्घाटन

नवी दिल्ली : खादीचा देशभर व्यापक प्रमाणात उपयोग केला जावा आणि शैक्षणिक संस्थांनी गणवेशासाठी खादीचा वापर करता येईल का याचा विचार करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी केले. 

जनतेने खादीला राष्ट्रीय वस्त्र म्हणून अंगीकारावे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींनी खादीच्या वापराला प्रोत्साहन द्यावे, असेही ते म्हणाले. खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीजने ‘आझादी का अमृत महोत्सव’चा भाग म्हणून येथे आयोजित केलेल्या ‘खादी इंडिया क्विझ स्पर्धेच्या उद्घाटनसमारंभात नायडू बोलत होते.

पर्यावरण रक्षणासाठी खादीच्या होणाऱ्या लाभांचा संदर्भ नायडू यांनी दिला. “खादीच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारचे इंधन किंवा विजेची गरज नसल्यामुळे कार्बन निर्माण होत नाही.  कपड्यांना दीर्घकाळ टिकणारा पर्याय म्हणून जग खादीकडे बघत आहे. खादी ही पर्यावरणस्नेही आणि टिकावू वस्त्र असल्यामुळे त्या गरजांची पूर्तता निश्चितच होते,” असेही नायडू म्हणाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यलढ्याशी जोडता येईल नाते 

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी खादीचा वापर करता येईल का याचा विचार करावा, असे सांगून नायडू म्हणाले की, तसे झाल्यास खादीच्या अनेक फायद्यांचा अनुभवच त्यांना घेता येईल, असे नाही, तर त्यांना महान स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्यलढ्याशीही नाते जोडण्यास मदत मिळेल.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी