आंध्र प्रदेशमधील शाळा ३ ऑगस्टपासून होणारपुन्हा सुरू; फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 01:29 IST2020-05-23T01:28:38+5:302020-05-23T01:29:04+5:30
राज्यातील शाळांमध्ये दिवसभरात विविध सत्रांमध्ये हे वर्ग भरविले जातील. शाळेतील विद्यार्थीसंख्येनुसार त्याचे वेळापत्रक बनविले जाईल.

आंध्र प्रदेशमधील शाळा ३ ऑगस्टपासून होणारपुन्हा सुरू; फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन
अमरावती : कोरोनाची साथ व लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेशातील गेले दोन महिने बंद असलेल्या शाळा आता ३ आॅगस्टपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील शाळांमध्ये दिवसभरात विविध सत्रांमध्ये हे वर्ग भरविले जातील. शाळेतील विद्यार्थीसंख्येनुसार त्याचे वेळापत्रक बनविले जाईल. त्यासंदर्भात आंध्र प्रदेशच्या शालेय शिक्षण विभागाने एक आराखडा तयार केला आहे.
एखादी शाळा व तेथील विद्यार्थी संख्या खूप मोठी असेल तर अशा ठिकाणी एक दिवसाआड प्रत्येक इयत्तेचे वर्ग घेण्याचा विचार सुरू
आहे. शाळा पुन्हा सुरू करण्यापूवी
त्या वास्तूतील सर्व गोष्टींचे सॅनिटायेझन करावे असे सरकारने म्हटले आहे.